मालवण ( प्रफुल्ल देसाई/भूषण मेतर ) श्री भराड़ी माते नमो नमः.... भराडी माते तुझा जयजयकार असो... असा आसमंत दुमदुमून टाकणारा जयघोष... या जयघोषातच भाविकांचा उसळलेला जनसागर अशा भक्तीपूर्ण, चैतन्यमयी आणि उत्साहवर्धक वातावरणात आज दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. सोमवारी भल्या पहाटे ३ वाजल्यापासून भराडी देवीच्या प्रांगणात जणू भक्तांचा महामेळा भरला. पहाटे पासूनच आंगणेवाडीकडे जाणारे सर्व रस्ते हे वाहनांनी भरून गेले होते. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेस आज पहाटे तीन वाजल्या पासून सुरुवात झाली. धार्मिक विधी संपन्न झाल्यावर पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांसाठी भराडी मातेचे दर्शन खुले करण्यात आले. नऊ वेगवेगळ्या रांगांमधून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे .आंगणेवाडीतील भराडी देवीच्या देवीच्या दर्शनानंतर स्वागत कक्षात आंगणे कुटूंबियांच्या वतीने यात्रेस आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .
पहाटेपासून भाविकांनी रांगद्वारे भराडी मातेचे दर्शन घेतले भाविकांच्या दर्शन रांगा पसरलेल्या दिसत होत्या एसटी महामंडळाने आपल्या हंगामी मसुरे, मालवण, कणकवली या तिन्ही स्टँडवरून प्रवाशाना सुरळीत सेवा पुरविली. तसेच गावागावातून खास यात्रा स्पेशल गाड्यांचे नियोजन केले होते. जिल्हा बँकेच्यावतीने फिरती एटीम सेवा, बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. नियंत्रण कक्षाकडून ग्रामस्थांना वेळोवेळी सूचना देण्यात येत होत्या




















2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)














































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.