loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्ह्यात ५५.७९ टक्के मतदान, मतदान टक्का घसरला

रत्नागिरी - जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी झालेल्या मतदानात चिपळूणमध्ये ६२.६० टक्के, दापोलीत ५३.८७ टक्के, खेडमध्ये ५५.२० टक्के, मंडणगडमध्ये ४८.७९ टक्के, गुहागरमध्ये ५६.५० टक्के तर रत्नागिरीत ५८.५२ टक्के, संगमेश्वरमध्ये ५३.८५ टक्के, लांज्यात ५१.१६ टक्के आणि राजापूर ४९.८७ टक्के इतके मतदान सकाळी ७.३० ते ५.३० दरम्यान झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एकंदरीतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये लग्नसराई असल्याने मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले. तसेच मुंबई गोवा महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाल्याने त्याचाही परिणाम जाणवला. अनेक ठिकाणी मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांमध्ये नाराजी पसरली.

टाइम्स स्पेशल

निवडणुक प्रक्रिया आदर्श पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणुक आयोगाने चांगले प्रयत्न केले. पोलिस खात्याने चोख बंदोबस्त ठेवला. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर राजकीय कार्यकर्त्यांना दूर करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान शांततेत पार पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg