loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड येथे नमन महोत्सव दि.९ ते ११ फेब्रुवारी रोजी ,जिल्ह्यातील नमन मंडळी होणार सहभागी...

वरवेली ( गणेश किर्वे ) : सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित दिनांक ९ ते ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ७ वा. पासून स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र, खेड, रत्नागिरी येथे नमन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नमन महोत्सवामध्ये सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा. पासून काळेश्वरी नाट्य नमन मंडळ, मुंबई,नवलाई नमन मंडळ निवळी, रत्नागिरी मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा. श्री सोंबा राघोबा राधाकृष्ण नमन मंडळ मोर्डे गवळीवाडी, संगमेश्वर श्री. हनुमान प्रासादिक भजनी भारुड मंडळ मांडकी खूर्द, चिपळूण कालकाई देवी रिमिक्स नमन मंडळ वाटद, रत्नागिरी,बुधवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता श्री आई महाकाली नमन मंडळ कोलधे, कुंभारवाडी-लांजा राजहस नमन मंडळ वरवेली रांजाणे वाडी, ता. गुहागर, कोकण नमन कलामंच रत्नागिरी आदी नमन मंडळे आपली नमन कला सादर करणार आहेत. सर्व कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg