loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद - पंचायत समितीचा निवडणुक निकाल उद्या, उमेदवारांमध्ये उत्कंठा शिगेला

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात काल जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणुका पार पडल्या. उद्या या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले असून, उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद असून, सत्तेचा गुलाल कोण उधळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काल दिवसभर झालेल्या मतदानानंतर आज तालुक्यात सर्वत्र निकालाचीच चर्चा सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोणत्या गटात कोणाचे पारडे जड आहे आणि कोणत्या गणात धक्कादायक निकाल लागू शकतात, याची आकडेमोड राजकीय वर्तुळात केली जात आहे. उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार असल्याने उमेदवारांची धाकधूक आता वाढलेली पाहायला मिळत आहे. कोण विजयी होतोय आणि कोण पराभूत? हे चित्र उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आपल्या विजयाची खात्री असली तरी, मतदारांचा नेमका कौल कोणाच्या बाजूने असेल, या विचाराने उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता दिसत आहे.

टाइम्स स्पेशल

उद्या होणार्‍या मतमोजणीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, निकालाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांमधील सत्तेची समीकरणे उद्या स्पष्ट होणार असून, गुहागरचा नवा कारभारी कोण ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg