रत्नागिरी (वार्ताहर)- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्हयात राज्यात सर्वात कमी म्हणजे ५५ टक्के मतदान झाले असून प्रत्येक तालुका मुख्यालयात सोमवारी ९ फेब्रुवारीला सकाळी १० वा. पासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. साधारणपणे २ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील असा अंदाज आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेना-भाजप महायुतीचा झेंडा फडकेल असा अंदाज एक्झिट पोलनी वर्तविला असला तरी एक्झाट पोल काय सांगतात याकडे तमाम जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
विविध वाहिन्या आणि संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता येवू शकते. शिवसेना स्वबळावर सत्तेवर येईल असेही काही एक्झिट पोलचे निकाल आहेत. तर काही पोर्ल्स नुसार शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून सत्ता स्थापन होईल. जिल्हा परिषदेत बहुमताचा जादुई आकडा २९ हा असून ५६ जागांपैकी शिंदेंच्या शिवसेनेला एकटयाला ३० जागा मिळतील असा सर्वसाधारणपणे एक्झिट पोलचा कौल आहे. शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपला ६ जागा मिळतील. तर राज्यात महायुतीच्या सत्तेत सहभागी असलेल्या पण जिल्हयात या निवडणुकीत काही ठिकाणी युतीसोबत तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार्या अजित पवार यंाच्या राष्ट्रवादीला जि.प.च्या ९ जागा मिळतील. ठाकरेंच्या शिवसेनेला १० जागा मिळतील आणि १ जागेवर कॉंगे्रसचा उमेदवार किंवा अपक्ष उमेदवार विजयी होईल असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतो. हा झाला एक्झिट पोलचा निकाल. परंतु खरा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. ९ ही तालुुक्यांच्या मुख्यालयात ९ फेब्रुवारीला सकाळी १० वा. मतमोजणीला सुरूवात होईल. रत्नागिरीची मतमोजणी कुवारबांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही मतमोजणी होईल.
जि.प. गटश: म्हणजे १ जि.प. गट आणि २ पंचायत समिती गण अशी मतमोजणी होईल. त्यासाठी २० टेबल लावली जातील. तसेच पोस्टल बॅलेटसाठी स्वतंत्र २ टेबल लावली जातील. अशाप्रकारे एकाचवेळी २२ टेबलवर मतमोजणी होईल. रत्नागिरीत साधारणपणे १८ ते १९ फेर्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होईल असा अंदाज आहे. रत्नागिरीमध्ये १० जि.प. गट आणि १९ पंचायत समिती गणांची मतमोजणी होणार आहे. पंचायत समितीची १ जागा बिनविरोध निवडून आली आहे. सकाळी १० वा. मतमोजणी सुरू होणार असून अंदाजे दुपारी २ ते अडीच वाजेपर्यंत ती पूर्ण होईली म्हणजेच २ वाजण्याच्या सुमारास ही मतमोजणी पुर्ण होईल असा अंदाज आहे. सगळ्यात पहिला निकाल गोळपचा लागेल. ११ फेर्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होईल, तर सर्वात शेवटचा निकाल वाटदचा लागेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मतमोजणीची जय्यत तयारी झाली असून पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी म्हणजे सोमवारी ९ फेब्रुवारीला सकाळी १० वा. मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्याचा विचार केला तर दुपारी २.३० वा.पर्यंत सारे चित्र स्पष्ट होईल असे अंदाज आहेत.




















2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)














































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.