loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत वनविभागासमोरील घराला भीषण आग; अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी वनविभाग कार्यालयासमोर असलेल्या एका निवासी घराशेजारील 'मागंरा'ला (साठवणुकीची जागा) मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की, काही वेळातच तिने रौद्र रूप धारण केले. मात्र, सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक नागरिकांनी केलेल्या युद्धपातळीवरील प्रयत्नांमुळे पहाटे ३ वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ​मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अचानक लागलेल्या या आगीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे कर्मचारी मदतीला धावले. सावंतवाडीतील वॉटर टँकरच्या साहाय्याने सुरुवातीला आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर सावंतवाडी आणि वेंगुर्ले नगरपरिषदेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वेंगुर्ले अग्निशमन दलाचे फायरमन गणेश परब, वाहन चालक गौरव आरेकर, गणेश जाधव, कर्मचारी देवेंद्र जाधव, पंकज पाटणकर आणि विनय जाधव यांनी जीवाची बाजी लावून आग विझवण्याचे काम सुरू केले. आगीचे गांभीर्य ओळखून कुडाळ एमआयडीसी आणि कुडाळ नगरपंचायतीचे अग्निशमन बंबही तातडीने मदतीला पोहोचले. सर्व यंत्रणांच्या सामूहिक प्रयत्नांना यश येऊन पहाटे ३ वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली. ​या आगीत घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, वेळीच मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी आग लागली तो भाग बंद असलेल्या 'मागंरा'सारखी मालमत्ता होती, तिथे कोणीही वास्तव्यास नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ​संदीप कुडतरकर व शरद सावंत यांनी या घटनेची प्राथमिक माहिती दिली असली, तरी सायंकाळपर्यंत या आगीबाबत अधिकृत तक्रार किंवा सविस्तर माहिती कोणाकडूनही देण्यात आली नव्हती. शॉर्ट सर्किटमुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg