loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा ग्रामस्थांची मंगळवारी श्री म्हातारेबाबा पदयात्रा

बांदा (प्रतिनिधी) - बांदा ग्रामस्थ मंडऴींच्या वार्षिक पदयात्रांचा सांगता समारोह मंगळवार दि. 10 फेब्रुवारी रोजी मोरगांव येथील प्रसिद्ध श्री देव म्हातारेबाबा देवस्थान येथे होणार आहे. दरवर्षीप्रमाणे बांदा ग्रामस्थांच्या श्री दत्तमंदिर माणगाव, श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर दाणोली, मठपर्वत येथील श्री रामभटस्वामी समाधी मंदिर ,श्री देवी माऊली सोनुर्ली, श्री घोडेमुख देवस्थान मातोंड, कास येथील श्री वाघबिळकार देवस्थान , श्री स्वामी समर्थ मठ डोंगरपाल डिंगणे, श्री गणेश मंदिर रेडी आदि पदयात्रा संपन्न झाल्या. या विविध पदयात्रांची सांगता दरवर्षी श्री म्हातारेबाबा देवस्थान येथील पदयात्रेने होते. मंगळवार दि.10 फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रामस्थांचे पदयात्रेने आगमन झाल्यानंतर नामस्मऱण व भजन होईल. त्यानंतर महानैवद्य व महाआरती होऊन महाप्रसाद कार्यक्रम होईल. या सोहळ्याचा पदयात्री व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळ अध्यक्ष उमेश मयेकर आणि उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी केेले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क -सुरेश चिंदरकर 98904 46811 यांच्याशी संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg