देवगड (दयानंद मांगले) - देवगड तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे.देवगड तालुक्यात माजी सभापती, उपसभापती,माजी जि प ,प.स.सदस्य यांचे भवितव्य मशीन मध्ये बंद झाले असून विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालणार हे चित्र ९ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर पंचायत समिती गणात भाजप महायुती शिवसेनेचे उमेदवार तालुका प्रमुख अमोल लोके व उबाठाचे गणेश वाळके यांची तर जि प गटात युवासेनेचे गणेश गावकर व भाजप महायुतीचे माजी सभापती सुनील पारकर यांच्यात थेट लढत झाली आहे. शिरगांव जिल्हा परिषद गटातून पाच उमेदवार रिंगणात असून उबाठा चे अभिषेक वसंत कदम, भाजप महायुतीचे देवदत्त दामोदर कदम, मनसे रंजन सदानंद शिरगांवकर तसेच मंगेश धर्मराज जाधव व प्रणय मनोहर चांदोस्कर हे उमेदवार रिंगणात असून त्यात ही सर्वच उमेदवार विजयाची खात्री देत आहेत. पुरळ जि प गटात भाजप महायुतीचे माजी जि प सदस्य संजय बोबडी व उबाठाचे सुनील तेली यांच्यात आमने सामने लढत होत आहे. ही निवडणूक दोन तुल्यबळ उमेदवार यांच्यात होतआहे दोन्ही उमेदवार विजयाची खात्री देत आहेत.तर पंचायत समितीच्या आठ गणांमध्ये निवडणूक होणार आहे.
देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जिल्हा परिषद गट पडेल आणि बापर्डे जिल्हा परिषद गट येथून पडेल जिल्हा परिषद गटातून सुयोगी रवींद्र घाडी या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार बिनविरोध तसेच बापर्डे जिल्हा परिषद गटातून भाजप महायुतीच्या अवनी अमोल तेली तर पोंभूरले जिल्हा परिषद गटातून अनुराधा महेश नारकर बिनविरोध निवडून आल्या आहेत..तसेच पडेल पंचायत समिती गणातून भाजपा चे अंकुश यशवंत ठुकरूल हे बिनविरोध तर नाडण पंचायत समिती मधून भाजपा चे गणेश सदाशिव राणे हे बिनविरोध विजयी झाले आहेत. तसेच पडेल पंचायत पंचायत समिती गण आणि नाडण पंचायत समिती गणातील भाजपचे २ उमेदवार बिनविरोध निवडून आले तसेच तालुक्यातील फणसगाव प. स. मधून समृद्धी संतोष चव्हाण शिरगांव प. स. मधून शीतल सुरेश तावडे, कोटकामते प. स. मधून ऋतुजा राकेश खाजणवाडकर, हे तीन भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. पुरळ पंचायत समिती गणातून भाजप महायुतीच्या संजना आळवे व उबाठाच्या सान्वी तिरलोटकर तर तिरलोट पंचायत समिती गणात माजी उपसभापती रवी तिरलोटकर विरुद्ध माजी प. स. सदस्य सुनील तिरलोटकर नशीब अजमावीत आहेत.
मणचे पंचायत समिती गणातून शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांच्याशी माजी जि प सदस्य विष्णू घाडी हे उबाठा चे उमेदवार लढत देत आहेत. एकंदरीत पहाता देवगड तालुक्यात भाजप महायुती विरुद्ध उबाठा अशीच लढत होत आहे. उर्वरित पंचायत गणामधून पोंभूरले मधून भाजप महायुतीचे माजी सरपंच सादिक जैनुद्दीन डोंगरकर, यांचे समोर उबाठा चे व्यकटेश नर हे आपले नशीब अजमावत आहेत. तळवडे पंचायत गणामधून माजी सरपंच मयुरी मंगेश जाधव या महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असून त्यांचे समोर शिवसेना महायुतीच्या सलोनी संतोष तळवडेकर यांनी आव्हान उभे केले आहे. किंजवडे प स. गणातून भाजप महायुतीच्या स्नेहा श्रीकृष्ण अनभवणे यांचे समोर मनसेच्या निकिता नारायण दाभोळकर लढत देत आहेत. पंचायत समिती मुणगे गणातून भाजप महायुतीचे माजी जि प प स. सदस्य सभापती सदाशिव पुरुषोत्तम ओगले यांचे सरपंच दीपक नारायण कदम उभे ठाकले आहेत. भाजप महायुती व उबाठा पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारात गाठीभेटीत दंग असल्याचे दिसून येत आहे.जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.एकंदरीत ९ फेब्रुवारी रोजी विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालते याकडे देवगड तालुकावासीय मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.




















2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)














































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.