loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईच्या समुद्रात १०० सागरी मैल अंतरावर तटरक्षक दलाच्या कारवाईत तीन संशयास्पद जहाज व कर्मचारी ताब्यात

मुंबई - मुंबईपासून १०० मैल समुद्र अंतरात मोठ्या हालचाली सुरु होत्या. तटरक्षक दलाने याकडे बारकाईने लक्ष ठेवले होते. गेले तीन दिवस ३ सागरी जहाज समुद्रात एकाच ठिकाणी थांबलेले होते. याकडे तटरक्षक दलाने लक्ष केंद्रीत केले. हा प्रकार नेमका आहे तरी काय? याची प्रथम दूरुनच पाहणी केली. अखेर या तीन जहाजांना भारतीय तटरक्षक दलाने पाळत ठेवून कारवाई केली. तिन्ही जहाजांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी मोठा खुलासा झाला. या तिन्ही जहाजांचे मालक परदेशात स्थायिक असून या संशयास्पद जहाजांची कसून चौकशी केली असता, चौकशी दरम्यान तेल तस्करी करणारे आढळून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

५ फेब्रुवारीपासून तटरक्षक दलाने पाळत ठेवली होती. हे ३ जहाज समुद्रात तेल आणि तेलजन्य उत्पादने दुसर्‍या जहाजात बेकायदा हस्तांतण करत असल्याचे उघड झाले आहे. जहाजातील तेल दुसर्‍या जहाजात चोरट्या पद्धतीने देण्याची प्रक्रिया तिथे सुरु होती. तटरक्षक दलाने या तिन्ही जहाजांवर कारवाई करुन मुंबई बंदरात आणले. यातील कर्मचारी भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात आहेत. भारतीय तटरक्षक दल बारकाईने अशा गोष्टींवर लक्ष ठेवून असतो.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg