loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटे औद्योगिक वसाहतीतील केसर कंपनीच्या आवारात आग; मोठी दुर्घटना टळली

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणाऱ्या लोटे औद्योगिक वसाहतीतील केसर कंपनीच्या आवारात रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. कंपनीच्या मोकळ्या परिसरात अचानक आग लागल्याने काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले होते, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आगीची माहिती मिळताच लोटे औद्योगिक वसाहतीच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करत अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने ही आग वेळेत आटोक्यात आणण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानाचा तपशील जाणून घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. आगीच्या घटनेनंतर औद्योगिक वसाहतीतील सुरक्षाव्यवस्थेबाबतही पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg