सर्वांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव आहे. आपल्या देशाचे विभाजन झाले त्यावेळी हिंदू-मुस्लीम यांच्यासाठी वेगळा देश म्हणून विभागला गेला. पाकिस्तान, बांगलादेशींनी मुसलमानांचा देश बनवला, भारत देश सर्वांचा बनला कारण आपण हिंदू आहोत, हीच चूक झाली हे म्हणणारी देखील नागरिक आहेत, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. मोहन भागवत म्हणाले की, संघाचे काम सर्व स्तरावर सुरू आहे यामध्ये आम्ही जात-पात करत नाही आम्ही भौगलिक क्षेत्र म्हणून काम करत असतो. शहरातील प्रत्येक परिसरात काम झाले पाहिजे. सर्व जातींच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही काम करतो. एससी-एसटी किंवा बाह्मण असे काही संघात नाही कोणीही सरसंघचालक होऊ शकते. जो संघासाठी वेळ देऊ शकेल असा माणूस संघचालक होऊ शकतो.
मोहन भागवत म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक जिथे जातात त्यांना माहिती असते की विरोध करणारी मंडळी सुद्धा आपलीच आहे. संघावर खूप अन्याय झाला, संघावर बंदी देखील घालण्यात आली पण जे झाले ते झाले समाज आपला असल्याने ते सोडून द्यायचे. अनेक वेळा लोक विरोध करतात पण नंतर संघाचे विचार आत्मसात करतात. मोहन भागवत म्हणाले की, समाजामध्ये भाषेचा वाद नाही काही लोकं असतात जे त्यावर वाद घालत असतात. हा स्थानिक आजार आहे त्याला मोठा करण्यात काही अर्थ नाही. तो पसरू नये यासाठी प्रयत्न आपण करू शकतो. राजकारणातील स्वार्थासाठी हे काम होत असते. पण हा वाद मोठा होता काम नाही. काहीच जण गुंडगिरी करतात त्याचा दोष समाजाला देऊन काही फायदा नाही.
मोहन भागवत म्हणाले की, संघ लोकांवर संस्कार करण्याचे काम करतो. त्यातून भ्रष्टाचार बंद होऊ शकतो. 19 वर्षांपासून 25 वर्षांपर्यत जर लग्न झाले आणि 3 मुले झाले तर मुले आणि त्यांचे पालक दोघेही अतिशय चांगले राहू शकतात. घरात जर एकापेक्षा जास्त मुले असतील तर मुलांचा विकास होत असतो. आपण 2.1 च्या खाली जात आहोत त्याकडे लक्ष घातले पाहिजे. सर्व शास्त्र सांगते की 3 अपत्ये असली पाहिजेत. पण याचा निर्णय कुटुंबियांचा आहे.




















2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)














































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.