loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यातील जि. प. पं. स. निवडणूक सरासरी ५९% टक्के मतदान

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील 3 जिल्हा परिषद गण 6 पंचायत समिती गण मधिल एकूण २८ उमेदवार यांच्यासाठी शनिवारी मतदान केंद्र या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान झालेल्या मतदान नुसार दोडामार्ग तालुक्यात सायंकाळी 5.30 पर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ५९% टक्के एवढे मतदान झाले. विधानसभा लोकसभा निवडणुकांमध्ये झाले त्या पेक्षा कमी मतदान झाले आहे. या कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार याकडे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. कुठेही काही झाले नाही. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयाचे लक्ष लागून राहिलेल्या माटणे मतदार संघात देखील मतदान शांततेत पार पडले. प्रत्येक उमेदवार तसेच शिवसेना भाजपा महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपला विजय निश्चित आहे. असा दावा केला आहे. तर ठाकरे शिवसेना तसेच अपक्ष उमेदवार यांनी जरी मोठया प्रमाणात धनशक्ती वापर झाला तरी आपल्याला यश मिळणार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला. दोडामार्ग तालुक्यातील तीन जिल्हा परिषद मतदार संघात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एकूण १७,३०१ जणांनी मतदान केले होते. यात स्ञी मतदार ८,६४१ तर पुरुष ८,६६० मतदार यानी मतदान हक्क बजावला होता.

टाइम्स स्पेशल

दोडामार्ग तालुक्यातील अनेक मतदान केंद्र ही नेटवर्क बाहेर असल्याने काही मतदान केंद्र माहिती 5.30 नंतर हाती आली. पण निवडणूक निर्णय असे यांच्या माहितीनुसार सरासरी ५९ टक्के एवढे मतदान झाले. दोडामार्ग तालुक्यातील 3 जिल्हा परिषद 6 पंचायत समिती मधिल उमेदवार यांचे नशीब आजमावले जाणारे मतदान मत यंञात बंद झाले आहे. सोमवारी काय अनपेक्षित निकाल लागतात याकडे लक्ष लागून आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg