loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषदेवर येऊ शकते शिवसेना-भाजपची सत्ता!

जिल्हा परिषदेच्या एकूण ५६ जागांपैकी एकट्या शिवसेनेला ३० ते ३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपला ५ ते ६ जागा मिळू शकतात. शिवसेना - भाजप युती निर्णायक बहुमतासह जिल्हा परिषदेत सत्तेवर येऊ शकते. शिवसेना उबाठाला ८ ते १० जागा मिळण्याचे अंदाज आहेत. राष्ट्रवादीला ६ ते ७ जागा मिळू शकतात तर मनसे जिल्हा परिषदेत खाते खोलू शकते असेही अंदाज आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरीत जिल्हा परिषदेच्या १० जागांपैकी ९ जागी शिवसेना बाजी मारण्याची चिन्हे आहेत. मात्र एका जागी अपक्ष चमत्कार घडवू शकतो असे म्हटले जात आहे. गोळप गटातून अपक्ष उमेदवार उदय बने यांच्या नावाची चर्चा आहे. पंचायत समितीत २०पैकी १५ ते १६ जागी शिवसेना तर ३ ते ४ जागी उबाठाला संधी दिसत आहे. चिपळूणमध्ये जि.प.च्या ९ पैकी ४ ते ५ जागी राष्ट्रवादी बाजी मारु शकते. शिवसेनेला २ ते ३, उबाठाला १ आणि भाजपला १ जागा मिळण्याचे अंदाज आहेत. पंचायत समितीच्या १८ जागांपैकी राष्ट्रवादीला ९ ते १०, भाजपला ३ ते ४, उबाठाला २ ते ३ तर शिवसेनेला १ ते २ जागा मिळण्याचे अंदाज आहेत. खेडमध्ये जिल्हा परिषदेच्या ८ जागांपैकी शिवसेनेला ५ ते ७ जागा मिळू शकतात. उबाठाला १ ते २ तर राष्ट्रवादीलाही १ ते २ जागा मिळण्याची शक्यता आहे. पंचायत समितीच्या १६ जागांपैकी शिवसेनेला १० ते १२, उबाठाला २ ते ३, भाजपला २ तर राष्ट्रवादीला १ जागा मिळण्याचे अंदाज आहेत.

टाइम्स स्पेशल

गुहागरमध्ये जि.प.च्या ५ जागांपैकी २ उबाठा तर २ महायुतीला जागा मिळू शकतात. एकाजागी भाजप आणि मनसे यांच्यात अटीतटीची लढत आहे. शृंगारतळीत मनसेच्या प्रमोद गांधी यांच्या नावाची चर्चा आहे. पंचायत समितीच्या १० जागांपैकी ५ उबाठा तर ५ महायुती अशी अटीतटीचल लढत होण्याचे अंदाज आहेत. लांजा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४ आणि पंचायती समितीच्या ८ जागांवर जोरदार लढती होणार आहेत. इथली लढत उन्नीस बीसची आहे. उबाठा आणि शिवसेना यांना समसमान यश मिळण्याचेही अंदाज आहेत. असेच अंदाज देवरुखमध्येही आहेत. राजापुरात शिवसेना उबाठा काहीशी आघाडी घेईल असे अंदाज आहेत. मंडणगडमध्येही उन्नीस बीसची लढत होण्याची चिन्हे आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg