मुंबई (प्रतिनिधी) - सगळ्यांचो लक्ष लागान रवलेल्या मुंबै महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदावर शेवटाक मालवण्यांचोच झेंडो फडाकलो. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदार मूळ मालवण तालुक्यातल्या पेंडूर खरारे गावची रहिवाशी रितू तावडे हेंच्या नावाची घोषणा झाली हा आणि ही घोषणा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम हेंच्यांनी शनिवारी केली आसा. इतक्याच न्हय तर उपमहापौर पदार शिंदे शिवसेनेकडसून संजय शंकर घाडी पडेल घाडीवाडी, ता. देवगड हेंच्या मालवण्याच्याच नावाची घोषणा झाली हा. हि घोषणा शिंदे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे हेंच्यांनी केली हा. त्यामुळा मुंबैतच न्हय तर अख्ख्या मालवणी भागात आनंदाचा वातावरण पसारलाहा आणि मुख्य म्हणजे आंगणेवाडी जत्रेनंतर ११ फेब्रुवारीक हि निवड होतली हा आणि तेच्यापेक्षा महत्वाचा म्हणजे रितू तावडे हेंच्या रूपान मुंबैत भाजपचो पहिलो महिला महापौर बसतलो हा.
मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुंबईच्या उपमहापौरपदी शिंदेसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुढील सव्वा वर्षांसाठी घाडी उपमहापौर असणार आहेत. भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, पण रितू तावडे यांनी बाजी मारली. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. ११ फेब्रुवारी मुंबई मनपा महापौर निवड होणार आहे. रितू तावडे या भाजपच्या मुंबईमधील पहिल्या महिला महापौर असणार आहेत. मुंबईची महापौरपदी निवड झाली असली तरी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. महापौरपद कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेक निवडून गेले आहेत. सभागृहाची गरिमा ठेवून मुंबईच्या हितासाठी पक्षभेद विसरुन निर्मळ आणि प्रामाणिक काम करावं अशी माझी अपेक्षा आहे, असं मुंबईच्या नव्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे म्हणाल्या.
रितू तावडे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. २०१२ मध्ये प्रभाग क्रमांक १२७ मधून विजय मिळवला होता. २०१७ मध्ये घाटकोपरमध्ये प्रभाग क्रमांक १२१ मधून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. यानंतर २०२५ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३२ मधून विजय मिळवला आहे. त्यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्या महापौर पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. दुसरीकडे, मुंबई मनपामध्ये शिवसेना शिंदे गटाचा उपमहापौर असणार आहे. शिंदे गटाकडून संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, शिंदे गटाकडून मुंबईत सुद्धा पदांची खांडोळी पायंडा कायम ठेवला आहे. संजय घाडी यांना सव्वा वर्षांचा कार्यकाळ असेल, अशी घोषणा शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केली. संजय घाडी १९८८-८९ पासुन शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचा विभाग प्रमुख, सन १९९०-९१ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंड कौन्सिलचे अध्यक्ष व सिनेट सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्य सरचिटणीस, शिवसेना उपनेते व सध्या शिवसेनेचा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. सन २०१७ ते २०२२ शिवसेना नगरसेवक होते. त्यांनी सलग दुसर्यांदा विजय मिळवला. त्यांच्या पत्नी संजना घाडी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आहेत. मुलगा सुयश युवासेना विधानसभा समन्वयक आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून कोणाला संधी दिली जाणार? याची चर्चा रंगली होती. भाजपचा उमेदवार मराठी असणार की अमराठी असणार?? अशीही चर्चा रंगली होती. मात्र, आता भाजपनेे ठाकरेंना कोणतीही संधी न देता रितू तावडे या मराठी उमेदवाराला संधी दिली आहे. रितू तावडे या गुजरातीबहुल घाटकोपरमधील आहेत. आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार देण्यात आल्याने ठाकरे गटाकडूनही उमेदवार दिले जाणार का? याची उत्सुकता आहे.




















2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)














































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.