loader
Breaking News
Breaking News
Foto

अजित पवारांच्या विमानात सुसाईड बॉम्बर, पायलट सुमित कपूर यांना संमोहित केल्याचा राष्ट्रवादी आमदाराच्या दाव्याने खळबळ

पुणे - दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठार मारण्यासाठी त्यांच्या विमानात सुसाईड बॉम्बर अर्थात आत्मघातकी हल्लेखोरांचा वापर करण्यात आल्याचा संशय राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार आणि अजितदादांचे खास समर्थक असलेले अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी हे प्रकरण थेट आत्मघातकी हल्ला असल्याचे म्हटल्याने मोठी खळबळ उडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज पत्रकारांशी संवाद साधताना, आमदार अमोल मिटकरी म्हणाले. दिवंगत अजित पवार यांना घेवून जाणार्‍या विमानाचे पायलट दोनवेळा बदलण्यात आले. व्हीएसआर कंपनीचे विमान अगोदरच नादुरुस्त होते. त्याच्यावर एक वर्षापासून बंदी होती. तरीही ते विमान २८ तारखेला अजित पवार यांना देण्यात आले. व्हीएसआर कंपनीने डिसेंबर महिन्यात आपल्या कंपनीच्या प्रत्येक वैमानिकाचा प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. जर ५० कोटींचा विमा उतरवला गेला असेल, आणि जोे पायलट ऐनवेळी बदलण्यात आला. त्याला हिप्नोटाईज केले होते का? त्याला आमिष दाखवण्यात आले होते का? अनेक ठिकाणी हिप्नोटॉईज करुन सुसाईड बॉम्बरचा वापर केला जातो, असे मिटकरी म्हणाले.

टाइम्स स्पेशल

अमोल मिटकरी यांनी आपल्या दाव्याखातर राजीव गांधी यांची हत्या व मुंबईवरील हल्ल्याचाही दाखला दिला. ते म्हणाले, अजमल कसाब यालाही दहशतवादी हल्ल्यासाठी पाठवण्यात आले होते. राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळीही असा प्रयत्न झाला होता. त्यामुळे अजित पवारांच्या विमानाच्या पायलटला हिप्नोटाईज करून पाठवले होते का? हा मोठा प्रश्न आहे. कारण, पायलटने 'मे डे'चा कॉल दिला नाही. टेक ऑफ घेतल्यानंतर काही वेळातच पुणे कव्हर करता आले असते, पण पायलटने ते केले नाही. त्यामुळे आम्हाला मोठी शंका व्हीएसआर कंपनीवर आहे. 50 कोटींचा विमा काढून त्यांनी पायलटला हे कृत्य करण्यास लावले का? याचाही तपास झाला पाहिजे. या प्रकरणी मी मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असे मिटकरी म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg