loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यात जामगे येथे नव वधूने बोहल्यावर चढण्यापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावला

खेड (दिलीप देवळेकर)- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील जामगे गावात लोकशाहीप्रती कर्तव्यभावना जपणारा एक प्रेरणादायी प्रसंग घडला. जामगे येथील नरळकर कुटुंबातील वधू रेश्मा हिचा दापोली तालुक्यातील माटवण येथील विवेक यांच्यासोबत विवाह सोहळा पार पडला. मात्र, विवाहाचा मुहूर्त गाठण्यापूर्वी रेश्माने आपल्या नागरिक कर्तव्याला प्राधान्य देत मतदानाचा मुहूर्त साधला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लग्नाची लगबग, विधी आणि वेळेची मर्यादा असूनही रेश्मा हिने वर्‍हाडयांसह थेट जामगे जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र गाठले. तेथे रेश्माने आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीप्रती असलेली निष्ठा व्यक्त केली. नववधूच्या या कृतीकडे पाहण्यासाठी मतदार, मतदान कर्मचारी तसेच गावकरीही थांबले होते. अनेकांनी तिच्या या निर्णयाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. विवाह हा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो, पण मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्य आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नव वधूने दिलेल्या या संदेशामुळे तरुण पिढीमध्ये मतदानाबाबत सकारात्मक जागृती निर्माण होत असून, ’आधी मतदान, मगच इतर कामे’ हा लोकशाहीचा खरा मंत्र अधोरेखित झाला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg