loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील ज्योतिबा मंदिरात आजपासून ‘खेटे’ उत्सवाला प्रारंभ

रत्नागिरी (वार्ताहर):- रत्नागिरीतील पेठकिल्ला परिसरात असलेल्या जागृत श्री देव ज्योतिबा मंदिरात आजपासून पारंपारिक ‘श्री ज्योतिबाचे खेटे’ उत्सवाला प्रारंभ होणार आहे. दि. ८ फेब्रुवारीपासून दि. १ मार्च २०२६ पर्यंत दर रविवारी हे खेटे होतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरीतील ज्योतीबा मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून प्रतिवर्षी परंपरेप्रमाणे मंदिरात ज्योतिबाचा खेटे उत्सव उत्साहात संपन्न होत असतो. यावर्षीही ८ फेब्रुवारीपासून खेटे सुरु होणार आहेत. श्री ज्योतिबा मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सध्या सुरु असून त्यामुळे श्रींची मूर्ती लगतच्या हॉलमध्ये स्थापन करण्यात आली आहे. दररोज पूजाअर्चा आणि दर्शन विधी हे या हॉलमध्येच होतात.

टाइम्स स्पेशल

‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’ असं म्हणत पारंपारिक खेटे उत्सव रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होत आहे. रविवार दि. १ मार्च २०२६ पर्यंत तो संपन्न होईल. दर रविवारी असे एकूण ४ खेटे होतील. ‘खेटे’ निमित्त दर रविवारी दुपारी १२ वाजता आरती होणार आहे. ज्योतिबा जयंती उत्सव या खेटे उत्सवानंतर गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी श्री ज्योतिबा जयंती उत्सव हादेखील साजरा होणार आहे. या ‘खेटे’ उत्सवाचा आणि ज्योतिबा जयंती उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ज्योतिबा मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रमुख श्री. राजन शेट्ये, अजय गांधी, सचिन गांधी आणि कार्यकारी मंडळाने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg