शृंगारतळी (प्रतिनिधी) : आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात जिथे लहान मुले मोबाईलच्या विळख्यात अडकत चालली आहेत, तिथे कोंडकारूळ ता. गुहागर येथील माईरा प्राविण्य जागकर हिने आपल्या जिद्दीच्या जोरावर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सरस्वती इंग्लिश मिडीयम प्री-स्कूल, वेळणेश्वरची विद्यार्थिनी असलेल्या माईराने राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक Gold Medal पटकावून कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सध्याच्या काळात मुले तासनतास मोबाईलमध्ये व्यस्त असतात. मात्र, मैदानी खेळांचे महत्त्व ओळखून माईराने स्वतःला मोबाईलपासून दूर ठेवले आणि खेळावर लक्ष केंद्रित केले. तिने याआधीही राज्य पातळीवर अनेक पदके मिळवून आपली छाप पाडली होती. आता राष्ट्रीय स्तरावर सुवर्णवेध घेत तिने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली आहे. माईराच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिचे, प्रशिक्षक आणि तिला सदैव प्रोत्साहन देणाऱ्या पालकवर्गाचे सर्वत्र कौतुक होत आहे. माईराच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत असून, तिच्या पुढील वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामस्थ व क्रीडाप्रेमींकडून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.




















2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)














































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.