संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया संगमेश्वर तालुक्यात शनिवार दिनांक ७ रोजी शांततेत पार पडली. तालुक्यात सरासरी ५३.८५ टक्के मतदान झाले असुन पाच ठिकाणी मतदान यंत्र बंद पडली होती, ती बदलण्यात आली. तर सकाळी प्रात्यक्षिक घेते वेळी ८ केंद्रातील ९ मतदान यंत्रे बंद होती. त्यातील काही दुरुस्त करण्यात आली काही बदलण्यात आली. तर पाच यंत्रे मतदानाला सुरुवात झाल्यावर बंद पडली तेथील यंत्रे बदलण्यात आली. यात मोर्डे, खडिकोळवण, निवधे, ओझरेखुर्द आणि धामापुर तर्फ संगमेश्वर येथील केंद्रांचा समावेश आहे. संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ गटांसाठी २० आणि पंचायत समितीच्या १४ गणांसाठी ४२ असे एकुन ६२ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. त्यांचे भवितव्य शनिवारी मतदान यंत्रात बंद झाले आहे. तालुक्यात सकाळी ९.३० वाजता १०.४२ टक्के मतदान, ११.३० ला २५.८८ टक्के मतदान, १.३० ला ३९.३० टक्के मतदान तर सायंकाळी ३.३० वाजता ४५.३५ टक्के एव्हडे मतदान झाले आहे. ३.३० पर्यंत एकुन ७२ हजार ४२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष ३५ हजार ६६० आणि ३६ हजार ७६३ महिला मतदारांचा समावेश आहे. दिवसभर तालुक्यात चोख पोलिस बंदोबस्त होता.
कोसुंब गटात हायव्होल्टेज लढत पहायला मिळाली. संगमेश्वर तालुक्यातील धामापुर तर्फ संगमेश्वर गटात उद्धवसेने कडुन सहदेव बेटकर, राष्ट्र्वादी अजित पवार गटाकडुन सुशील भायजे, वंचित आघाडीकडुन अजित कांबळे आणि अपक्ष म्हणुन जगन्नाथ राऊत यांच्यात लढत झाली. कडवई गटात उद्धवसेनेचे संतोष थेराडे, भाजपचे विनोद म्हस्के व काँग्रेसचे आशिष सुर्वे यांच्यात कसबा गटात उध्दवसेनेच्या विशाखा कुवळेकर, शिंदेसेनेच्या रचना महाडिक यांच्यात लढत झाली. मुचरी गटात शिंदेसेनेच्या माधवी गिते, उद्धवसेनेच्या ललिता तांबे आणि अपक्ष म्हणुन नुपुरा मुळ्ये लढल्या. कोसुंब गटात भाजपकडुन प्रमोद अधटराव, उध्दवसेने कडुन जनक जागुष्टे, शिंदेसेनेकडुन रोहन बने आणि काँग्रेसकडुन चंद्रकांत मोरे याबरोबरच साडवली गटात भाजप कडुन रुपाली कदम, उध्दवसेनेकडुन नेहा माने तसेच दाभोळे गटात विलास चाळके, वंचित कडुन विरश्री बेटकर हे उमेदवार निवडणुक रिंगणात असुन, शनिवारी त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले. सोमवारी देवरुख मधील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या कम्प्युटर सायन्स विभागात मतमोजणी होणार आहे.




















2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)














































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.