loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेला भरघोस प्रतिसाद, पालकवर्गाचे उत्तम सहकार्य

रत्नागिरी - १९ व्या जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो आणि पुमसे स्पर्धेला जिल्हाभरातील खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद मिळाला. दिनांक ६,७,८ फेब्रुवारी २६ या कालावधीत ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून सुमारे ६०० स्पर्धक विविध गटात सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी रत्नागिरी तायक्वांदो संघाच्या सर्व पालकांनी मिळून घेतली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष आणि रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश कररा, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, रत्नागिरी तायक्वांडो संघाचे मयूर धुळप, तसंच डॉ. प्रियांका कांबळे, सोनाली आयरे हे उपस्थित होते. मान्यवरांच स्वागत अमोल गराटे, राम करा, गुरुप्रसाद सावंत,अमित जाधव, शशिरेखा कररा, तन्वी साळुंखे यांनी केले.

टाइम्स स्पेशल

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, शिवरायांची प्रतिमा पूजन, श्रीफळ वाढवून कोर्टच उद्घाटन करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि या स्पर्धेच्या आयोजनात महिला पालक वर्गाने जे सक्रिय आणि नियोजनबद्ध योगदान दिलं त्याबद्दल अभिनंदन केलं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg