loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यातील पुनस, उपळे, सालपे या केंद्रांसह अन्य बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना

लांजा (संजय साळवी) - शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतदान प्रक्रिये दरम्यान लांजा तालुक्याती पुनस, उपळे, सालपे या केंद्रांसह अन्य बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्या होत्या.‌ सकाळपासुनच मतदारांमध्ये मतदानाबाबत निरुत्साह दिसून आला. हा निरुत्साह दुपारपर्यंत कायम होता. दुपारनंतर मतदानाच्या टक्क्यात वाढ होईल असे वाटले होते. मात्र दुपारनंतरही मतदारांमधील निरुत्साह कायम राहिला. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होवू शकली नाही. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी एकूण ५१.१६ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानाबाबत सकाळपासूनच मतदारांमध्ये कमालीचा निरुत्साह दिसून आला होता. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली. अनेक मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मतदार नसल्याने त्याठिकाणी शुकशुकाट जाणवत होता. त्यामुळेच सकाळ सत्रात १२.७६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यामध्ये आसगे जिल्हा परिषद गट ११ टक्के, भांबेड जिल्हा परिषद गट १०.८१ %, साटवली जिल्हा परिषद गट १२.१३ %, गवाणे जिल्हा परिषद गट १२.७६ % सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत २७.५७ टक्के मतदान झाले.‌ आसगे जि. प. गट २६.१३ टक्के, भांबेड २५.७८ %, साटवली २९.१९ % , गवाणे २९.१५ %. त्यानंतर दुपारी १.३० पर्यंत अवघे ३९.८४ % इतक्या अत्यल्प मतदानाची टक्केवारी होती. दुपारपर्यंत हिच परिस्थिती कायम राहिल्याने मतदान करण्यासाठी मतदार‌ फारसा उत्साहीत नसल्याचे दिसून आले.‌ त्यात पुनस, उपळे, सालपे या केंद्रांसह अनेक ठिकाणी मतदानयंत्रे (ईव्हीएम मशीन) बंद पडण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटल्याचे चित्र दिसून आले. तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणासाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र या मतदान करण्यासाठी सर्वच ठिकाणी मतदारांचा फारसा उत्साह नसल्याचे चित्र दिसून आले.‌ अनेक मतदान केंद्रांवर मतदारांचा संपूर्ण दिवसभर शुकशुकाट जाणवला. दुपारी १.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी - आसगे जि. प. गट ३९.६०%, भांबेड जि. प. गट ३९.५३ %, साटवली जि. प. गट ३९.१४%, आणि गवाणे जि. प. गट ४०.९६% याप्रमाणे मतदान झाले होते.‌ त्यानतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल अशी अपेक्षा होती.‌ मात्र त्यात फारसा बदल झालेला नाही.‌ दुपारी ३.३० पर्यंत ४५.३१ टक्के मतदान झाले.‌ यामध्ये आसगे जि. प. गट ४४.९०%, भांबेड जि. प. गट ४५.०१%, साटवली जि. प. गट ४४.०४%, आणि गवाणे जि. प. गट ४७.०८ %. इतके मतदान झाले.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तालुक्यात ५१.१६ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ९ तर पंचायत समितीच्या २६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg