loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात आगीच्यादोन घटना-मुंब्र्याच्या आगीतचार वाहने जाळून खाक

ठाणे:(प्रतिनिधी) ठाण्यात कळवा आणि मुंब्र्यात आगीच्या दोन घटना शनिवारी घडल्या. यामध्ये कळव्याच्या घोलाईनगरमध्ये मीटर बॉक्स किरकोळ आग लागली.तर मुंब्र्याच्या रेतीबंदर बायपास रोड येथे विसर्जन घाटाजवळ पत्र्याच्या झोपडीला आग लागली. यात बाजूला पार्किंग केलेल्या तीन रिक्षा आणि एक दुचाकी अशी चार्वहने जाळल्याची घटना शनिवारी सकाळी ७-४५ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी आपत्ती आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. कुठलंहीजीवितहानी झालेली नाही तर वित्तियहानी झाल्याचे समोर आले आहे.मुंब्रा बायपास रोडवरीलरेतीबंदर विसर्जन घाट २ जवळ तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या पत्र्याच्या झोपडीसह बाजूला पार्क केलेल्या वाहनांना आग लागल्याची माहिती दक्ष नागरिक शंकर खारमाटे यांनी मोबाईल फोनवरून ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. त्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलाचे जवान, यांनी धाव घेत त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केल्या आग सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg