loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली पोलिसांची करडी नजर; सागरी किनाऱ्यांवर कडक बंदोबस्त

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - भारतीय तटरक्षक दलातर्फे आयोजित 'सागरी कवच अभियान २०२५' च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले असून, संपूर्ण किनारपट्टीवर कडक पहारा ठेवण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक बगाटे यांच्या आदेशानुसार आणि दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तोरस्कर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली दापोलीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने हे अभियान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या अभियानाअंतर्गत दापोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खालील ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महत्वाच्या सागरी जेटी, सर्व लँडिंग पॉईंट्स, विविध चेक पोस्ट, संभाव्य धोके ओळखून आणि सागरी सुरक्षा अबाधित राखण्यासाठी दापोली पोलीस प्रशासन पूर्णपणे 'अलर्ट मोड'वर आहे. नागरिकांनी देखील काही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

सागरी कवच अभियान २०२५

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg