loader
Breaking News
Breaking News
Foto

नव्या वर्षाआधीच मुंबईकरांना मोठं गिफ्ट; हार्बर मार्गावर आजपासून दोन नवीन स्थानकं सुरू

नवी मुंबई: नव्या वर्षाच्या स्वागताआधीच मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. हार्बर रेल्वे मार्गावर आजपासून दोन नवीन रेल्वे स्थानकं प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. तारघर आणि गव्हाण अशी या दोन स्थानकांची नावे असून, यामुळे लोकल प्रवास अधिक आरामदायी, जलद आणि सोयीस्कर होणार आहे.तारघर हे हार्बर मार्गावरील अत्यंत महत्त्वाचं स्थानक ठरणार आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळच हे स्थानक उभारण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी काळात विमानतळ सुरू झाल्यानंतर तारघर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मुंबईतून नवी मुंबईत ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी हे स्थानक मोठा दिलासा देणार आहे. विशेषतः पनवेल, बेलापूर, उलवे आणि परिसरातील प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे. तारघर रेल्वे स्थानक उभारण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेलं हे स्थानक प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हार्बर मार्गावरील गव्हाण रेल्वे स्थानक सुरू झाल्यामुळे परिसरातील स्थानिक प्रवाशांचा उपनगरीय रेल्वेचा प्रवास अधिक सोपा होणार आहे. आतापर्यंत लांब अंतरावर असलेल्या स्थानकांमुळे प्रवाशांना अतिरिक्त प्रवास करावा लागत होता. गव्हाण स्थानक सुरू झाल्याने हा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहेत. या स्थानकामुळे परिसरातील वसाहती, औद्योगिक क्षेत्र आणि कार्यालयीन प्रवाशांना थेट रेल्वेसेवेचा लाभ मिळणार असून, रस्ते वाहतुकीवरील ताणही काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

टाइम्स स्पेशल

या दोन्ही नवीन स्थानकांमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. लोकलमधील गर्दीचे विभाजन होण्यास मदत होईल, तसेच नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येसाठी ही पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg