loader
Breaking News
Breaking News
Foto

छंदोत्सव 2025 अंतर्गत क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन संपन्न

र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास होण्यासाठी राबविण्यात येणारा आणि अनेक अभ्यासहेतर उपक्रमांचा मानबिंदू असणारा 'छंदोत्सव' अंतर्गत वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ जवाहर क्रीडांगणावर संपन्न झाला. त्याप्रसंगी व्यासपीठावर र. ए. सोसायटीचे उपकार्याध्यक्ष ॲड . विजयराव साखळकर, सहकार्यवाह आणि एम.सी.व्ही.सी चे विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत दुदगीकर, शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई, वरिष्ठ महाविद्यालय जिमखाना अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष प्रा. महेश नाईक, प्रमुख अतिथी ऐश्वर्या सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर, छंदोत्सव प्रमुख मकरंद दामले, वरिष्ठ महाविद्यालय कला शाखा विभाग प्रमुख डॉ.कल्पना आठल्ये, परीक्षा नियंत्रण समिती प्रमुख डॉ.विवेक भिडे, कला वाणिज्य व विज्ञान शाखांचे विभाग प्रमुख, या सर्व क्रीडा महोत्सवाचे नियोजन करणारे प्रा. लीना घाडीगावकर व प्रा राकेश मालप, सर्व शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त, आंतरराष्ट्रीय खोखो खेळाडू, भारत सरकार तर्फे राणी लक्ष्मी पुरस्कार प्राप्त आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यकारी अधिकारी म्हणून सेवेत रुजू झालेल्या ऐश्वर्या यशवंत सावंत लाभल्या. यावेळी ॲड. विजय साखळकर यांच्या हस्ते ऐश्वर्या सावंत यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मारुतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि मैदानावर श्रीफळ वाढवून या महोत्सवाची सुरुवात झाली. याप्रसंगी प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी या महोत्सवाची रूपरेषा सांगून सर्व विद्यार्थ्यांना खेळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले, तर ॲड. साखळकर यांनी आपल्या मनोगतात जिद्द व परिश्रमाने विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या खेळामध्ये प्राविण्य संपादन केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच विविध खेळामधून नेतृत्व गुण विकसित होतात, शरीरयष्टी बळकट बनून मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहते. म्हणून विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला पाहिजे व सर्व खेळ खिलाडूवृत्तीने खेळले पाहिजेत, असे विचार मांडले.

टाइम्स स्पेशल

मान्यवरांच्या हस्ते रस्सीखेचचा उद्घाटनाचा प्रदर्शनीय सामना अकरावी वाणिज्य आणि अकरावी विज्ञान या दोन संघात संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवामध्ये आऊटडोअर उपक्रमांमध्ये क्रिकेट, रस्सीखेच, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी, 100, 400, 800 व 1500 मीटर धावणे, रिले 4×400, गोळाफेक तर आउट डोअर मध्ये बॅडमिंटन,टेबल टेनिस, कॅरम व बुद्धिबळ अशा विविध खेळांमध्ये विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अदिती कोकजे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg