loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्हा शालेय कॅरम स्पर्धा, सावंतवाडीचे वर्चस्व कायम

​सावंतवाडी (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय १४, १७ आणि १९ वयोगटातील मुला-मुलींच्या कॅरम स्पर्धांमध्ये यंदाही सावंतवाडी तालुक्यातील खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दि. १२ व १३ डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल येथे झालेल्या या स्पर्धांमध्ये सावंतवाडीच्या खेळाडूंनी सर्वाधिक विजेतेपद पटकावली. ​प्रमुख विजेते (पहिले ते सहावे क्रमांक):​ १९ वर्षाखालील गट ​मुले: प्रथम क्रमांक स्वप्नील लाखे (सावंतवाडी) याने पटकावला. द्वितीय अथर्व तेंडुलकर (वेंगुर्ले), तृतीय सुयश रणशिंगे (कणकवली), चौथा आर्यन गवंडळकर (मालवण), पाचवा भूषण मडगावकर (सावंतवाडी), तर सहावा साईराज राऊळ (कुडाळ) यांनी यश मिळवले. ​मुली: प्रणिता आयरे (सावंतवाडी) हिने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय दीक्षा देवगडकर (कुडाळ), तृतीय दुर्वा राणे (मालवण), चौथी गंगुताई पाटील (मालवण), पाचवी मानसी करंगुटकर (वेंगुर्ले) व सहावी रिया गावडे (दोडामार्ग) यांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१७ वर्षाखालील गट: ​मुले: अमूल्य घाडी (सावंतवाडी) हा या गटात प्रथम आला. द्वितीय शार्दुल भोगटे (कुडाळ), तृतीय सुधांशू धुरी (कुडाळ), चौथा विराज पेडणेकर (कुडाळ), पाचवा आदित्य धर्णे (दोडामार्ग), तर सहावा यश म्हापसेकर (दोडामार्ग) यांनी क्रमांक पटकावले. ​मुली: प्रथम क्रमांक पूर्वा केतकर (देवगड) हिने पटकावला. द्वितीय साक्षी रामदुरकर (सावंतवाडी), तृतीय निदा होलसेकर (देवगड), चौथी श्रेया महाडिक (कणकवली), पाचवी आस्था लोंढे (सावंतवाडी) व सहावी आर्या सावंत (कणकवली) यांनी स्थान मिळवले. ​ १४ वर्षाखालील गट: ​मुले: भरत सावंत (सावंतवाडी) याने प्रथम, तर पियुष परब (सावंतवाडी) याने द्वितीय क्रमांक मिळवून सावंतवाडीचे यश अधोरेखित केले. तृतीय विराज चौगुले (देवगड), चौथा सार्थक वायंगणकर (कणकवली), पाचवा मंथन पास्ते (सावंतवाडी), तर सहावा गणेश परब (सावंतवाडी) हेही विजेते ठरले.

टाइम्स स्पेशल

​मुली: या गटात दिव्या राणे (कुडाळ) हिने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय आरजू शेख (सावंतवाडी), तृतीय ईश्वरी आदम (देवगड), चौथा दिया साटम (देवगड), पाचवी जान्हवी सोनार (कणकवली), तर सहावी रेवा पाटील (मालवण) यांनी यश मिळवले. ​आता विभागीय स्पर्धेची तयारी: ​जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी ठरलेले हे सर्व खेळाडू आता विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. येत्या १६ व १७ डिसेंबर रोजी कुडाळ मराठा समाज हॉल येथे क्रिडा विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर,सातारा व सांगली जिल्ह्यातील १४,१७ व १९ वयोगटातील मुलं आणि मुलींच्या विभागीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

विभागीय स्तरावरील स्पर्धा १६ व १७ डिसेंबर रोजी

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg