loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईसह २९ महापालिकांचे १५ जानेवारीला मतदान

मुंबई - महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगातर्फे मुंबईसह २९ महानगरपालिकांचे मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. आणि १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज सायंकाळी ४.०० वाजता पार पडली.जालना इचलकरंजी यांची पहिल्यांदाच महापालिका निवडणूक होत आहे. २९ महानगरपालिकांच्या निवडणूकी उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची तारिख २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार तर १६ जानेवारी २०२६ मतमोजणी होणार आहे. दुबार मतदारांना एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे. मुंबईसाठी १० हजार १११ मतदान केंद्र आहेत. या निवडणूकीत ४८ तास अगोदर प्रचारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. बृहन्मुंबईसाठी खर्चाची मर्यादा उमेदवारासाठी १५ लाख रुपये आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg