loader
Breaking News
Breaking News
Foto

देशाच्या राजकारणात शुक्रवारी मोठा भूकंप, पंतप्रधान बदलणार?

पिंपरी-चिंचवड येथे एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे भाकित केले आहे. त्यामुळे १९ डिसेंबरला नेमके काय होणार यांची चर्चा सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतील एका कायद्याचा संदर्भ देत सांगितले की, १९ डिसेंबर रोजी अमेरिकेच्या संसदेत एफस्टीन नावाच्या व्यक्तीशी संबंधित एका प्रकरणात मोठी माहिती जाहीर होणार आहे. हा एफस्टीन नावाचा व्यक्ती मोठा फायनान्सर असून इस्राईयलचा गुप्तहेर म्हणून काम पाहत होता. त्यांने एक मोठे स्टिंग ऑपरेशन केले आहे. अनेक बडया नेत्यांच्या रूममध्ये त्यांने कॅमेरे लावले होते. अतिशय संवेदनशील अशा या स्टिंग ऑपरेशनमध्ये महत्वपूर्ण माहिती आहे. जी बाहेर आल्यास अवघ्या जगात खळबळ उडेल. अनेक नेत्यांचे मुलींसमवेत असलेले फोटो व्हायरल झाले आहेत. या माहितीमुळे बडे-बडे नेते अडचणीत येवू शकतात. त्यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बील क्लिटंन, उद्योगपती एलान मस्क, ब्रिटनचे राजकुमार अशा बडया हस्तींचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. १९ डिसेंबरला अमेरिकन संसदेमध्ये ही माहिती सार्वजनिक केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा अप्रत्यक्ष परिणाम भारताच्या राजकारणावरही होऊ शकतो, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचित केलं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील एक श्रीमंत वित्त व्यवस्थापक (फायनान्सर) होता. तो अतिशय श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांचे पैसे गुंतवण्याचे काम करत होता. न्यूयॉर्क, फ्लोरिडा आणि स्वतःच्या खासगी बेटावर तो मोठ्या लोकांशी मैत्री ठेवत असे. मात्र, याच काळात त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे गंभीर आरोप झाले. त्यांने लावलेल्या गुप्त कॅमेर्‍यांमध्ये बडया हस्तींचे एक दोन नव्हे तर तब्बल ७५ हजार फोटो आहेत. ते व्हायरल होवू लागल्याने सार्‍या जगात खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड येथील सभेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की, १९ डिसेंबर रोजी नेमके काय होईल हे आत्ताच सांगणं कठीण आहे. सध्या अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. काही लोकांनी काही विशिष्ट कृती केल्या आहेत आणि काही लोकांची नावे पंतप्रधानपदाच्या चर्चेत आहेत. त्यामुळे काहीतरी सकारात्मक घडेल अशी आशा आहे. जर असे घडले तर मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल, असं चव्हाण म्हणाले. मात्र हा माणूस कोण हे सांगितले नाही.

टाइम्स स्पेशल

पुढे बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, जर मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल, तर सध्याच्या पंतप्रधानांना बाजूला व्हावे लागेल. बदल होण्याची शक्यता दिसत आहे, पण हा बदल झाला तरी कॉंग्रेसचा पंतप्रधान होणार नाही, कारण कॉंग्रेसकडे सध्या बहुमत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नागपूरला संधी आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे नितिन गडकरी पंतप्रधान होणार असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविल्याची चर्चा सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी अमेरिकेतील एका कायद्याचा उल्लेख केला. १९ डिसेंबर रोजी अमेरिकेच्या संसदेत एका कायद्यानुसार काही महत्त्वाची माहिती सार्वजनिक होणार आहे. एफस्टीन नावाच्या व्यक्तीशी संबंधित एका प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात काही मोठ्या नेत्यांची नावे असण्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर काही नावे व्हायरल होत आहेत. सुमारे ७५ हजार फोटो आणि २० हजार ई-मेल्स समोर येण्याची शक्यता आहे. अमेरिकन संसदेने स्पष्ट केलं आहे की, ही माहिती शोधता आणि डाउनलोड करता येईल. कोणताही मोठा नेता असला तरी त्याला संरक्षण दिलं जाणार नाही, असंही चव्हाण यांनी सांगितलं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg