loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण, ठाणे परिसरातील नोकरी, धंद्यानिमित्त राहणाऱ्या तेली समाज बंधुभगिनींची संवाद बैठक

वरवेली (गणेश किर्वे) - रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संल्लग्न महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण,ठाणे परिसरातील नोकरी,धंद्यानिमित्त या भागात रहाणारे सर्व तेली समाज बंधुभगिनींची संवाद बैठक टिळकनगर विद्यामंदिर डोंबिवली पुर्व येथे आयोजित केली होती. या बैठकीला रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ जिल्हाध्यक्ष रघुविर रामचंद्र शेलार हे उपस्थित होते. बैठकीला सुरवात करताना मुंबई युवाचे अध्यक्ष प्रविण रहाटे यांनी उपस्थित सर्व समाज बंधुभगिनींचे स्वागत केले व आजच्या बैठकीचा उद्देश विषद करीत रत्नागिरी जिल्ह्याचा कार्याचा आढावा घेत प्रास्ताविक केले. रत्नागिरी जिल्हा संघाचे आजीव सभासद, कोकण स्नेहीचे संपादक आणि या बैठकीचे आयोजक सुरेश पडवळकर यांनी अचानक ठरवून सुध्दा चांगल्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मार्गदर्शन करताना रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे काम समाधान कारक असल्याचे मत व्यक्त केले. व आपण सर्वांनी एकत्रित पणे सहकार्य करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष रघुविर शेलार यांनी रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचे चित्र डोळ्यासमोर उभे करीत सविस्तर आढावा घेतला. आणि आजच्या या संवाद बैठकीच्या तुमच्या साथीने सहकार्याच्या पाठबळावर आम्ही आमच्या उद्दिष्टापर्यंत कसे पोहचू शकतो हे अपेक्षांसह पटवून दिले.संवाद बैठकीमध्ये सुजितकुमार रसाळ, कमलाकर शेलार, प्रविण रहाटे, रविंद्र महाडीक, मनोज रसाळ, वासुदेव चाफेकर, दिगंबर भडकमकर, गणेश धोत्रे, मंगेश रसाळ यांनी दिलखुलास चर्चेत सहभागी होत सर्वोतोपरी रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

टाइम्स स्पेशल

बैठकीला संजिवनी वासुदेव चाफेकर, विद्या देवेंद्र रहाटे, सौरभ राणे, तुषार रसाळ, मनोज रसाळ, राजेंद्र चिमाजी पावसकर आवर्जून उपस्थित होते. वरील सर्व तेली समाज बंधभगिनींनी अतिशय कमी वेळात ही मिटिंग घडवून आणली म्हणून जिल्हाध्यक्ष रघुविर शेलार यांनी सर्वांचे विषेश आभार मानून धन्यवाद दिले. व बैठक समाप्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg