loader
Breaking News
Breaking News
Foto

दिनांक १७ डिसेंबर रोजी रोजी तेली समाजाचे दैवत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी सोहळा

वरवेली (गणेश किर्वे) - श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी सोहळा बुधवार दिनांक १७ डिसेंबर रोजी तेली समाजातील वाडी वस्त्यांवर साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन पट पुढील प्रमाणे. संतांचे कार्य मानवजातीच्या कल्याणासाठी असते. श्री संत संताजी महाराज हे एक महान संत होऊन गेले समाज सुधारणेचे काम ही त्यांनी केले हे सर्व आपणास माहितच आहे. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. वडील विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे श्री संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांना हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे श्री संताजी महाराजांनी देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे श्री संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही. श्री संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. त्यांना कीर्तनाला भजनाला जाण्याची आवड लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चवदा टाळकऱ्या पैकी एक झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून प्रभोधन देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा श्री संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा श्री तुकाराम महाराज श्री संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून श्री संताजींवर तुकाराम महाराजांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा संत श्री तुकारामांनी श्री संताजीना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून श्री संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी संत तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.

टाइम्स स्पेशल

शेवटच्या क्षणी समाधीवर माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी श्री संताजीना दिले होते. परंतु तुकाराम महाराज हे श्री संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की, जेव्हा श्री संताजीचे देहावसान झाले तेव्हा अंत्य संस्काराच्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही श्री संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते, त्यांचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर श्री संताजींचा पूर्ण देह झाकला गेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg