राजापूर (वार्ताहर): मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर सशक्त, धारदार आणि जागतिक दर्जाची ओळख मिळवून देणारे तालुक्यातील माडबन गावचे सुपूत्र ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी कै. गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गवाणकर फॅन क्लब व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभागीय खुल्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कोकणाच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव करणारी असून, सात जिल्ह्यांतील कलावंतांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. ही स्पर्धा मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागातील सातही जिल्ह्यांसाठी खुली असून, या सर्व भागांतील हौशी व व्यावसायिक रंगकर्मी, नवोदित कलाकार, लेखक-दिग्दर्शक यांना सहभागी होता येणार आहे. कोकणच्या मातीत रुजलेल्या लोकभाषा, सामाजिक वास्तव, लोकजीवन, परंपरा व समकालीन प्रश्न यांना एकांकिकेच्या माध्यमातून अभिव्यक्त करण्यासाठी ही स्पर्धा एक प्रभावी संधी उपलब्ध करून देत आहे.
कै. गंगाराम गवाणकर यांनी ‘निवडणूक’, ‘वस्त्रहरण’ यांसारख्या गाजलेल्या नाट्यकृतींमधून मालवणी भाषेची ताकद, तिचा उपरोध, विनोद आणि सामाजिक भान प्रभावीपणे मांडते. त्यांनी केवळ लेखक म्हणूनच नव्हे, तर समाजभान जपणार्या विचारवंत रंगकर्मी म्हणून मराठी रंगभूमीला नवे परिमाण दिले. त्यांच्या हयातीतच त्यांनी मालवणी भाषेला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आणि आज त्यांच्या पश्चातही त्यांचा हा वारसा जिवंत ठेवण्याची जवाबदारी समाजावर आहे. याच भावनेतून आयोजित करण्यात आलेली ही कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा म्हणजे केवळ स्पर्धा नसून, गंगाराम गवाणकरांच्या विचारांना, त्यांच्या साहित्यपरंपरेला आणि मालवणी भाषेच्या सांस्कृतिक सामर्थ्याला दिलेली अर्थपूर्ण आदरांजली आहे. नव्या पिढीतील कलाकारांनी स्थानिक बोली, लोकजीवन आणि सामाजिक प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहावे, त्यातून सशक्त कलाकृती निर्माण व्हाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची जिल्हावार तारीख स्पर्धेचे नियम व अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा दि. ३ जानेवारी संपर्क-रमण वायंगणकर ९६२३७२७९२०, हेमंत करगुटकर- ९९२३२३५१२७, रत्नागिरी जिल्हा दि. ४ जानेवारी, संपर्क राजीव कीर ९४२२४२९८९८, नंदू गवाणकर- ९४०५४७९२३६, ९२८४५१६३६६, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्हा दि. १० व ११ जानेवारी संपर्क- दशरथ कीर- ७३०४०५३३८७, समीर चव्हाण- ९८२१८१२३३८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर व मुख्य सचिव प्रकाश कांबळी यांनी केले आहे.































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.