ठाणे, दि. 15 (प्रतिनिधी ) : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या लोकोपयोगी प्रकल्पांचा फायदा लाखो ठाणेकर नागरिकांना होणार आहे. त्यात कासारवडवली येथील खाडीकिनारी Viewing Tower आणि Convention Centre, कोलशेत येथे टाऊन पार्क, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्नो पार्क, ॲमेझॉन पार्क, ॲडव्हेंचर पार्क, पक्षी संग्रहालय तसेच ठाणे आंतरराष्ट्रीय मेट्रो जोडणी आदी विविध प्रकल्पांचा समावेश असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेस मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, आंतरराष्ट्रीय किर्तीचे आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.
ठाणे शहरातील कासारवडवली खाडीकिनारी येथील 50 एकर जागेत मंगल कलशाच्या संकल्पनेनुसार 260 मीटर उंचीचा देशातील सर्वात मोठा टॉवर आयफेल टॉवरच्या धर्तीवर उभारण्यात येत आहे.विशेष म्हणजे आयफेल टॉवरची उंची ही 300 मीटर आहे. याठिकाणी Viewing Tower आणि Convention Centre यांचा समावेश असणार आहे. हे काम हफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्या संकल्पनेनुसार डिझाईन करण्यात आले आहे. कोलशेत येथे 25 एकर जागेवर बीओटी तत्वावर टाऊन पार्क उभारण्यात येत आहे. या टाऊनपार्कमध्ये आगरी कोळी संग्रहालय, विज्ञान सेंटर, मत्सालय आणि क्रीडासंकुल यांचा समावेश असणार आहे. याची वैशिष्टय म्हणजे याठिकाणी तळ अधिक एक मजली एलिव्हेटेड उदयानांचा समावेश आहे. कोलशेत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे Snow Park, Amusement Park, Adventure Park 25 एकर जागेत उभारण्यात येणार आहे. कोलशोत येथे 12.5 एकर जागेत पक्षी संग्रहालय उभारण्यासाठी राज्यशासनाकडून 10 कोटीचानिधी उपलब्ध झाला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2036 च्या ऑलिपिंकच्या तयारीचा भाग म्हणून 50 एकर जागेत Sports Arena उभारण्यात येणार आहे. तर 25 एकर जागेत म्युझिकल कॉन्सर्ट तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
ठाणेकरांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा यासाठी ठाण्यात मेट्रो सेवा लवकरच सुरू होत आहे. या मेट्रो सेवेला म्हातार्डी बुलेट ट्रेन स्टेशन,दिवा, मुंब्रा, कळवा हे मार्ग जोडले जाणार आहे. एकूण 9.8कि.मीचा प्रवासाचा मार्ग असणार आहे. तर म्हातार्डी ते कोपर मार्गे डोंबिवली 4.1 कि.मी आणि म्हातर्डी ते तळोजा मेट्रो लाइन 12 शी जोडणारा- 3.2 कि.मी चा हा मार्ग असणार आहे. यासाठी DPR महामेट्रो तयार करत आहे. एकूणच ठाणेकरांना जास्तीत जास्त मुलभूत सोईसुविधा आणि मनोरंजनात्मक साधने उपलब्ध व्हावीत या दृष्टीने ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.