loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई येथे झालेल्या जाखडी स्पर्धेत बामणोली येथील शिवशक्ती नाच मंडळ पूर्व तांबेवाडी कला पथकाचा सन्मान

वरवेली (गणेश किर्वे) - कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई यांच्यावतीने मुंबई येथे गौरी गणेश जाखडी नृत्यं स्पर्धा २०२५ चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चिपळूण तालुक्यातून.शक्तीवाले शिवशक्ती नाच मंडळ बामणोली पूर्व तांबेवाडी या एकमेव मंडळाने सहभाग घेत चिपळूणचे प्रतिनिधीत्व केल्याने त्यांचा मंडळाच्यावतीने सन्मान करण्यात आला.या मंडळाने जाखडी स्पर्धा आणि शाहीर सन्मान सोहोळा कार्यक्रम आयोजित करून जाखडी लोककलेचा प्रसार करण्याचे काम केले आहे. यामध्ये चिपळूण तालुक्यातून फक्त एकाच नाच मंडळाने सहभाग नोंदवला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बामणोली येथील शक्तीवाले शाहीर करण गोरीवले यांचे शिवशक्ती नाच मंडळ पूर्व तांबेवाडी यांनी सहभाग घेत आपली कला सादर केली. या वेळी त्यांचे गुरुवर्य सीताराम भोबस्कर आणि वस्ताद उपस्थित होते. त्यांनी बहारदार नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल त्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कला पथकामध्ये गायक शाहीर कु. करण किसन गोरीवले, कलापथक प्रमुख / चालक तुकाराम सुवरे, ढोलकी पट्टू अजिंक्य सुवरे / शैली वादक कु. प्रणय तांबिटकर, कोरस संदीप तांबिटकर, रोहित गोरीवले, प्रसाद गोरीवले, अभिनंदन कातकर, नृत्य कलाकारामध्ये कुणाल गोरीवले, विहान तांबिटकर, आदित्य तांबे, प्रतीक गोरीवले, वेदांत तांबे, जयेश तांबिटकर, किशोर कातकर, यश तांबिटकर प्रथमेश आग्रे, आशिष तांबे. या सर्वांनी सहभाग घेतला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg