loader
Breaking News
Breaking News
Foto

वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे निसर्ग निवास शिबिर संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे निसर्ग निवास शिबिर मालवण तालुक्यातील कुणकवळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे संपन्न झाले. या शिबिरास माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशालेतील विद्यार्थी, स्काऊट गाईड शिक्षक,मुख्याध्यापक व संस्थाचालक यांचे हा उपक्रम राबवल्याबद्दल कौतुक केले. तसेच जीवनात येणाऱ्या समस्यांवर मात कशी करायची याचे शिक्षण निसर्ग निवास शिबिरातून आपल्याला मिळते. शिबिरात मिळणाऱ्या कौशल्याचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील आयुष्यात करावा, असे यावेळी शिक्षणाधिकारी शिंपी यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या दोन दिवसीय निसर्ग निवास शिबिरात स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वतः जेवण बनवण्याचा आनंद घेतला. तसेच स्काऊट गाईडच्या अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिकेही केली. या शिबिरात विद्यार्थ्यांनी संघ भावना, नेतृत्व गुण, मेहनत करण्याची तयारी, जीवन कौशल्य, सहकार्य भावना असे विविध गुण प्रत्यक्ष कृतीतून अनुभवले. त्याचबरोबर शेकोटी कार्यक्रमातून आपल्या विविध कलागुणांना वाव दिला. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपताना कुणकवळे गावातील ओहोळावर वनराई बंधारा घालत पाणी अडवा आडवा, पाणी जिरवा हा संदेश दिला व जल संवर्धनामध्ये आपला सहभाग दर्शविला.

टाइम्स स्पेशल

या शिबिरासाठी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया मुख्याध्यापिका व गाईड कॅप्टन देवयानी गावडे, स्काऊट गाईड विभाग प्रमुख समीर चांदरकर, स्काऊट मास्टर एकनाथ राऊळ, किसन हडलगेकर, भूषण गावडे, गाईड कॅप्टन सिमरन चांदरकर, अमिषा परब, माजी शिक्षिका संध्या तांबे, ज्योती मालवदे, शप्रकाश कदम यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिरास कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आनंद वराडकर, कुणकवळे सरपंच, मंदार वराडकर, जि.प. केंद्र शाळा कुणकवळेचे मुख्याध्यापक सरनाईक व कुणकावळे गावचे ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त - कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर संचालिका स्वाती वराडकर तसेच सर्व संचालक व संचालिका, स्मिता कम्प्युटरच्या संचालिका श्रद्धा नाईक यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg