loader
Breaking News
Breaking News
Foto

क्षत्रिय धार पवार संस्था दिनदर्शिकेचे प्रकाशन व पारितोषिक वितरण समारंभ थाटात संपन्न

मुंबई - क्षत्रिय धार पवार संस्थेच्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच भाईंदर पूर्व येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवलेले अनेक धार पवार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा प्रकाशन व पारितोषिक वितरण सोहळा श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक नाट्यगृह, भाईंदर पूर्व येथे रवि. दि. ७ डिसें. २०२५ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद क्षत्रिय धार पवार चॅरिटेबल संस्थेचे उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग प्रभारी तुषार विश्‍वासराव यांनी भूषविले. यावेळी मध्य कोकण क्षत्रिय पतसंस्थेचे भूतपूर्व संचालक सुरेश दळवी व कराटेपटू करण पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यावर छ. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि उपस्थित धार पवार भगिनींनी कुलस्वामिनी गडकालिका मातेच्या प्रतिमेचे पूजन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अमित पवार यांनी प्रस्तावना केली. तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते धार पवार दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन करण्यात आले आणि संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण यावेळी संपन्न झाले. सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्हे व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष प्राविण्य मिळविणार्‍या धार पवार बंधू भगिनींचा यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कराटेपटू करण पवार यांनी २०० पेक्षा अधिक पारितोषिके प्राप्त केली असून त्यांची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे, त्याबद्दल त्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ९ वर्षाची रिदा राहुल पवार हिने स्केटींगमध्ये राष्ट्रीय पातळीवर सिल्व्हर व ब्रॉन्झ पदक देशाला मिळवून दिले त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार तिचे आजोबा विठोबा पवार यांनी स्वीकारला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. संतोषदादा पवार यांनी धार पवारांचा संक्षिप्त इतिहास कथन केला तसेच क्षत्रिय धार पवार संस्थेचे व्यवसाय विभाग प्रमुख विशाल पवार यांनी व्यवसाय विषयक मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित केले. या कार्यक्रमाचे वेळी जितेंद्र पवार, रा. बोरीवली यांनी संस्थेला देणगीचा धनादेश दिला, हा धनादेश त्यांनी संस्थेचे खजिनदार विकास पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाचे अध्यक्ष तुषार विश्‍वासराव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेला सहकार्य करणार्‍या सर्वांचे आभार मानले. त्यांनी यावेळी धार पवार कुलाच्या उपनावांबद्दल माहिती दिली. यावेळी अमित पवार यांनी सूत्रसंचालन केले तर विशाल पवार यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी धार पवार बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे खजिनदार विकास पवार, सह खजिनदार अमित पवार, उपसचिव सुरज पवार, सहकार्याध्यक्ष सुशांत विश्‍वासराव, इतिहासतज्ञ संतोषदादा पवार, ठाणे संपर्क प्रमुख अनिल दळवी, रायगड विभाग प्रमुख रणजीत पवार, शिक्षण विभाग प्रमुख प्रणय पवार, जन संपर्क प्रमुख स्वप्नील पवार, व्यवसाय विभाग प्रमुख विशाल पवार, डोंबिवली विभाग प्रमुख दत्तात्रय पवार, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष दिनेश पवार, उत्तर पश्‍चिम जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पवार, विनोद पवार, विनय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg