loader
Breaking News
Breaking News
Foto

फुरूस गावातील ग्रामस्थ व मुंबईकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश

खेड (प्रतिनिधी) - फुरूस ता. खेड येथील रघुनाथ आप्पा पवार, रुकीया सनगे सरपंच फुरूस, रुपेश चौगुले मा सरपंच फुरूस, सत्यवान घाणेकर अध्यक्ष मुंबई मंडळ, सुभाष चौगुले अध्यक्ष ग्रामीण समिती, हरिश्चन्द्र घाणेकर ग्रा.पं.सदस्य फुरूस, अवंतिका चौगुले ग्रा. पं. सदस्य फुरूस, साधना वैराग सदस्य ग्रा. पं. फुरूस, लियाकत सणगे, गीतेश वैराग शाखा प्रमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी माझ्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. सर्व पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत केले आणि पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पक्षात नव्याने सहभागी झालेल्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना ‘पक्षाची विचारधारा, पक्षनेतृत्वाचे कार्य आणि विकासाचा दृष्टीकोन तळागाळापर्यंत पोहोचवून खेड तालुक्यात पक्षविस्तार आणि संघटन मजबूत करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील सर्व जुन्या नव्या सहकाऱ्यांनी एकजुटीने आणि निष्ठेने प्रचारकार्यात कार्यरत राहावे’, असे आवाहन केले.

टाइम्स स्पेशल

याप्रसंगी बाबाजीराव जाधव जिल्हाध्यक्ष रत्नागिरी, साधना ताई बोत्रे महिला जिल्हाध्यक्षा, रत्नागिरी, स. तु.कदम विधानसभा क्षेत्राअध्यक्ष दापोली विधानसभा, रमाताई बेलोसे प्रदेश सरचिटणीस, संजयराव जाधव तालुका अध्यक्ष, आनंदराव भोसले, आत्माराम कदम, श्रीधर गवळी, सुबोध जाधव, लिपिक परकार चंद्रकांत वरणकर, राजेंद्र विचारे, भाई मोगरे, नवाज मसुरकर, व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg