loader
Breaking News
Breaking News
Foto

होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत रोटरी स्कूलच्या 30 विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड

खेड (प्रतिनिधी) - मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत होमीभाभा बालवैज्ञानिक प्रथम पातळी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आली. या परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या इ. 6 वीच्या 28 व इ. 9 वीच्या 2 विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून होमिभाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या द्वितीय पातळीसाठी निवड होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता 6 वी मधील श्रीहर्ष आग्रे, श्रेयश आलेगावकर, विराज गावडे, पूर्वी सुर्यवंशी, अर्णव घुंबरे, प्रसाद भोसले, आरव सुर्वे, श्रवण कासार, स्वराज पाटोळे, अथर्व हलगवार, अनविका गोंडकर, मीरा आग्रे, अनुश्री पवार, वेदा वालपकर, मयुराज शिगवण, हर्ष पवार, अर्णव गोफणे, देवांश जैन, अशर चौगुले, मनस्वी डोंगरे, वेद यादव, अधिराज गाडबैल, अफिफ कटमले, श्लोक दळवी, आरंभ मोरे, कांक्षी भांड, अरहम परकार, मानवी सानप, इ. 9 वी मधील साई दळवी, सर्वेश दामले, यांनी यश प्राप्त करून आपले व प्रशालेचे नाव गौरवित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून तब्बल 30 विद्यार्थी होमीभाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड होण्याचा बहुमान प्राप्त करणारी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल ही एकमेव शाळा आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची 4 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या द्वितीय पातळीकरिता निवड झाली आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व विज्ञान विषय शिक्षक दिपाली दरेकर, तेजश्री क्षीरसागर, तनुजा चव्हाण, राहुल चव्हाण, प्रसाद सावंत, वैष्णवी धुमाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या द्वितीय पातळी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg