loader
Breaking News
Breaking News
Foto

ए. के. आय. दाभोळला तिरंदाजीमध्ये ३ चषकांची घवघवीत कामगिरी

दाभोळ (वार्ताहर) - मुंबई येथील यतीमखाना व मदरसा ए. के. आय. ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही २०२५–२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बाह्य शाखांसाठी ही भव्य क्रीडा स्पर्धा १० व ११ डिसेंबर २०२५ रोजी ए. के. आय. महाबळेश्वर येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकूण ७ बाह्य शाळांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी या क्रीडा स्पर्धेत विविध वैयक्तिक व सांघिक खेळांचा समावेश करण्यात आला होता. फुटबॉल, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, धावण्याच्या स्पर्धा, गोळाफेक, लांब उडी यांसह यंदा प्रथमच तिरंदाजी या खेळाचा समावेश करण्यात आला होता. तिरंदाजीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ट्रस्टने घेतलेला हा निर्णय विशेष उल्लेखनीय ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या क्रीडा महोत्सवात ए. के. आय. दाभोळच्या एकूण ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली. दाभोळ शाखेने एकूण १ सुवर्णपदक, २ रौप्यपदके व ११ कांस्यपदकांची कमाई केली. विशेष म्हणजे तिरंदाजी या खेळात ए. के. आय. दाभोळने प्रथमच सहभाग घेत असूनही ३ चषके पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात तैमिना आरिफ दर्वेश हिने द्वितीय क्रमांक मिळवला, १४ वर्षांखालील मुलींच्या गटात खदिजा राहिल काझी हिने तृतीय क्रमांक पटकावला, तर १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अहमद समीर बामणे याने द्वितीय क्रमांक मिळवत दाभोळचे नाव उज्वल केले.

टाइम्स स्पेशल

या नेत्रदीपक यशाबद्दल यतीमखाना व मदरसा ए. के. आय. ट्रस्ट, मुंबई यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच ए. के. आय. दाभोळचे मुख्याध्यापक फजलुद्दीन जमालुद्दीन बामणे, क्रीडाशिक्षिका अफरीन अबूबकर शेख, तिरंदाजी प्रशिक्षक अनामिका आवेरे व संकेत शिंदे, व्हॉलीबॉल प्रशिक्षक मुफ्ती माज अली मियॉ मांडलेकर तसेच संपूर्ण ए. के. आय. दाभोळचे शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg