loader
Breaking News
Breaking News
Foto

वीज ग्राहकांच्या उपस्थितीतच स्मार्ट मीटर बसविले जातील : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात महावितरणकडून घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरु असून त्यांच्या उपस्थितीतच हे मीटर लावले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत दिली. परस्पर कंपनीचे प्रतिनिधी स्मार्ट मिटर बसवून जात असल्याच्या तक्रारी येत असून या पार्श्‍वभुमीवर मुख्यमंत्री जे वीज मंत्रीही आहेत त्यंनी ही ग्वाही विधानसभेत दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शीळ, मुंब्रा, कळवा आदी परिसरात टोरंट कंपनीकडून सक्तीने वीजबिल वसुली सुरु आहे, शेतकर्‍यांना मोफत वीज योजना असूनही त्यांच्याकडून वसुली सुरु आहे, आदी मुद्दयांवर राजेश मोरे यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. या चर्चेदरम्यान शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) भास्कर जाधव यांनी स्मार्ट मीटर सक्तीचा मुद्दा उपस्थित केला. कोकणातील अनेक चाकरमानी बराच काळ मुंबईत असतात व त्यांची घरे बंद असतात. पण त्यांच्या घराची कुलुपे तोडून महावितरणकडून जुनी मीटर काढून स्मार्ट मीटर बसविले जात असल्याची तक्रार जाधव यांनी केली.

टाइम्स स्पेशल

घरगुती ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविले जाणार नाहीत, असे आश्‍वासन फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते, तरीही स्मार्ट मीटर सक्तीने व ग्राहकांच्या घरात घुसून त्यांच्या अनुपस्थितीत लावले जात असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात सांगितले. त्यावर ग्राहकांच्या अनुपस्थितीत स्मार्ट मीटर बसविणे चुकीचे असून तसे न करण्याचे आणि ग्राहकांच्या उपस्थितीतच स्मार्ट मीटर बसविण्याचे आदेश दिले जातील, असे ना. फडणवीस यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला फीडर, शासकीय कार्यालये व इतरांना स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून आता घरगुती ग्राहकांसाठी आता स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. स्मार्ट मीटर बसविणार्‍या ग्राहकांची वीजबिले पूर्वीपेक्षा वाढलेली नाहीत, उलट १० टक्के सवलत देण्यात आली असून ती पाच वर्षे लागू राहील. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविणार्‍या वीजग्राहकांचा फायदा आहे. या ग्राहकांसाठी ऍप असून त्यावर प्रत्येक तासाला किती वीज वापरली गेली, याची माहिती मिळते, असे ना. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg