loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजणार? आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकांबाबत आज मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याचा आयोगाचा मानस असून, 15 जानेवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महापालिका निवडणुकांमधील सर्वात मोठा अडथळा मानले जाणारे आरक्षणाचे प्रकरण सध्या तरी अडसर ठरणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेषतः ओबीसी आरक्षण आणि 50 टक्के आरक्षण मर्यादेबाबत गेल्या काही महिन्यांपासून संभ्रम निर्माण झाला होता.नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे.त्यामुळे या ठिकाणी निवडणूक होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू होती. या दोन्ही ठिकाणी आधी 50 टक्क्यांच्या आत आरक्षण ठेवून प्रभाग रचना करूनच निवडणूक घ्यावी लागेल, असा तर्क लावला जात होता. मात्र, निवडणूक आयोगाने हा तर्क फेटाळून लावला आहे.आयोगाच्या भूमिकेनुसार, 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडली असली तरी त्या ठिकाणी निवडणूक घेऊ नये, असे न्यायालयाने कुठेही स्पष्टपणे सांगितले नाही. त्यामुळे अशा महापालिकांमध्ये निवडणूक घेता येईल आणि निकालही जाहीर करता येईल. मात्र, या निवडणुकांचे निकाल ओबीसी आरक्षण आणि 50 टक्के मर्यादेबाबत न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील.

टाइम्स स्पेशल

महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनीही तयारी वेगाने सुरू केली आहे. उमेदवारांची चाचपणी, संभाव्य युती-आघाड्यांबाबत चर्चा आणि स्थानिक पातळीवर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. महापालिका निवडणुका या 2024 नंतरच्या राजकीय समीकरणांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानले जात असल्याने या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.दरम्यान आज दुपारी 4 वाजता होणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यातून राज्यातील महापालिका निवडणुकांचा नेमका रोडमॅप स्पष्ट होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg