loader
Breaking News
Breaking News
Foto

१५ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा चिवला बीच मालवण येथे उत्साहात संपन्न

मालवण - 15 राज्यस्तरीय ओपन सागरी जलतरण स्पर्धा 13 व 14 डिसेंबर चिवला बीच मालवण आयोजक महाराष्ट्र अकवाटिक असोसिएशन येथील स्पर्धेत रत्नागिरीतील 9 जलतरणपटूनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.सर्व स्पर्धक मागील दोन महिन्यांपासून भाटये येथील समुद्रमध्ये सराव करत होते.मालवण समुद्रातील जेली्फिश, अत्यन्त थंड पाणी, मोठया लाटा यांमुळे अतिशय खडतर मानली जाणाऱ्या स्पर्धेत राज नितीन राऊत, यश देवदास, आयुष चव्हाण, श्रीयांश वाघाटे, रत्नराज पाटील, रुद्र लाड, ऑस्टीन फ्रँको, जतीन भोसले यांनी स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र मधून सुमारे 1500 स्पर्धक सदर स्पर्धेत सहभागी झाले होते. 12 वर्षातील गटामध्ये 2 किलोमीटर, 14 वर्षाखालील गटामध्ये 3 किलोमीटर आणि 25 वर्षाखालील गटामध्ये 5 किलोमीटर स्पर्धा पार पाडली. त्यामध्ये 25 वर्षाखालील गटामध्ये ऍकवा टेकनिक स्विमिंग अकादमी चा यश देवदास याने 5 किलोमीटर स्पर्धेत टॉप 10 मध्ये फिनिश करून 9 वा क्रमांक मिळवून रत्नागिरी ला पदक मिळवून दिले. सर्व जलतरण पटूना Nis, SFI, ASCA सर्टिफाईड कोच विवेक विलणकर यांचे मार्गदर्शन लाभले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg