loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील किनारे पर्यटकांनी फुलणार! नाताळ, नववर्ष स्वागतासाठी बुकींग होतेय हाऊसफूल

संगलट खेड (इक्बाल जमादार) - कोकणातील निसर्ग रमणीय समुद्र किनारे हे सातत्याने पर्यटकांना भूरळ घालणारे असेच आहेत. त्याच बरोबर कोकण किनारपट्टीतील ऐतिहासीक मंदिरे, सागरी किल्ले आणि सर्वात महत्वाचे विविध प्रकारचे मासे हे पर्यटकांना कोकणात अगदी खेचून आणतात. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांच्या किनारीभागात अगदी समुद्रास लागून गेल्या १० ते १२ वर्षात निर्माण झालेली पर्यटकांसाठीची घरगुती निवारा व्यवस्था, कॉटेजेस, हॉटेल्स यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या १० वर्षांत विक्रमी वाढ झाली आहे. यंदा देखील कोकणातील सागरकिनारे पर्यटकांनी फुलू लागले असून आगाऊ बुकींग फूल होत असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगीतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान कोकणात आलेल्या या एकूण पर्यटकांपैकी सर्वाधीक पर्यटक डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या निमीत्ताने आले होते. गेल्या १० वर्षांत कोकणात येणाऱ्या पर्यटकांमध्ये फॅमिली टूरिझम अर्थातसहकुटूंब पर्यटन आणि गृप टूरिझम अर्थात समुह पर्यटन या दोन संकल्पना अधिक दृढ होताना दिसून येत असल्याचा दिसून येत आहे. अटल सेतू आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे कोकणातील जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. ज्यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळाली आहे. मुंबई येथील पर्यटक थेट कोकणात पोहोचत आहेत. मुंबईतून रो रो सेवेने आपल्या वाहनांसह थेट रायगड जिल्ह्यात पोहोचता येत असून पूढे जंगल जेट्टींच्या माध्यमातून थेट रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांना पोहोचता येते. हा प्रवास संपुर्णपणे समुद्र किनाऱ्यांनी असल्याने अत्यंत आल्हाददायक असाच असून तो पर्यटकांना भावतो. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे, येथील पर्यटनाला पर्यटकांची विशेष पसंती आहे. कोल्हापूर, सांगली आदी पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या येथे मोठी आहे.

टाइम्स स्पेशल

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, गुहागर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, हरिहरेश्वर, रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा, अलिबाग अशा भागातील पर्यटन स्थळे पर्यटकांच्या पसंतीत उतरलेली आहेत. दरवर्षी कोकणाकडे येणारा पर्यटक आपली राहण्याची व जेवणाची व्यवस्था अगोदरच बुकींग करुन ठेवतो. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ऑनलाईन आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg