loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल ठराविक कालावधीत दयायला हवा, माजी सरन्यायाधीश भुषण गवईंचे स्पष्ट मत

मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय संघर्षाबाबत न्यायालयाने ठराविक कालावधीत याबाबतचा निर्णय द्यायला हवा असे देशातील भुतपूर्व सरन्यायाधीश भुषण गवई यांनी म्हटले आहे. मात्र हा खटला आपल्या खंडपीठासमोर नव्हता अशी टिपणीही केली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, पक्ष फुटीच्या निकालाबाबत कोर्टात काय घडले? याविषयी चर्चा सुरू आहेत. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना फुटली, आमदार फुटले या प्रकरणावर अद्याप कोर्टाने निकाल दिलेला नाही. यामुळे अशा प्रकरणांमध्ये दिरंगाई होते असा आरोप केला जातो. असा प्रश्‍न भूषण गवई यांना विचारण्यात आला. भूषण गवई महाराष्ट्राच्या पक्ष फुटीच्या निकालाबाबत स्पष्ट मत मांडले. मात्र, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण आपल्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी आले नव्हते यामुळे या प्रश्‍नावर काहीच भाष्य करणार नाही असे गवई म्हणाले. कोर्टाने अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये ठराविक कालावधीत हा निर्णय घ्यावा. असे निर्देश दिले जातात असे भूषण गवई यांनी स्पष्ट केले. न्याव्यवस्थेववर सत्ताधार्‍यांचा अंकुश असतो असा अरोप केला जातो. मात्र, हा आरोप चुकीचा असल्याचे गवई म्हणाले. राजकारणात येण्याचा सध्या कोणताही विचार नसला तरी भविष्यात नियतीच्या मनात काही असेल तर सांगता येत नाही असं निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंनी सांगितलं.

टाइम्स स्पेशल

काही सामाजिक मुद्यांवर काम करण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच एका याचिकेवर निवाडा करताना भगवान विष्णूंबाबत केलेलं वक्तव्य करायला नको होतं असं त्यांनी म्हटलंय. आपण जे बोललो त्याचा वेगळा अन्वयार्थ लावण्यात आल्याचंही ते म्हणाले. पण झालेल्या वादानंतर आपण पुढच्या काळात निवाड्यावेळी टिपण्णी करताना अधिक सजग झाल्याचंही त्यांनी सांगितलं. कोल्हापूरला हायकोर्टाचं सर्किट बेंचची स्थापनेची स्वप्नपूर्ती झाल्यानं भावुक झाल्याचं निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंनी सांगितलं. या मुलाखतीत त्यांनी कोल्हापूर सर्किट बेंचच्या निर्मितीबाबतच्या संकल्पाबाबत सांगितलं. कोल्हापूर सिंधुदुर्ग पट्‌ट्यातील लोकांसाठी त्या भागात खंडपीठाची आवश्यकता होती. सरन्यायाधीश झाल्यावर कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रश्‍न मार्गी लावू असा संकल्प केला होता हा संकल्प पूर्ण झाल्यानं आपण भावुक झाल्याचं गवईंनी सांगितलं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg