loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने मालवण चिवला बीच येथे आयोजित १५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी पाच किलोमीटर अंतर स्पर्धेत वेगवान जलतरणपटू म्हणून मुलांच्या गटात चैतन्य शिंदे (पुणे) आणि मुलींच्या गटात अहुजा उगले (नाशिक) तर तीन किलोमीटर अंतर स्पर्धेत वेगवान जलतरणपटू म्हणुन मुलांच्या गटात शिवस्मीत बिरादार (छत्रपती संभाजीनगर) आणि मुलींमध्ये रेवा परब (ठाणे) यांना तसेच दोन किलोमीटर अंतर गटात मुलांमध्ये मोहित काकणकर (बेळगाव) आणि मुलींमध्ये गितीषा भंडारे (ठाणे) यांना वेगवान जलतरणपटू म्हणून सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिवला बीच येथे होणारी ही राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा देशातील विशेष स्पर्धा असून स्पर्धेत ६ ते ७५ वर्षे वयाहून अधिक वयाचे स्पर्धक भाग घेत असलेली ही स्पर्धा होती. यावर्षी तर चार वर्षांपासून ९५ वर्षे वयापर्यंत स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून दिव्यांग जलतरणपटूंसाठी वेगळ्या गटाचे आयोजन केले आहे. यावर्षी महाराष्ट्रसह आठ राज्यांमधील सुमारे १२०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावर्षीपासून या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे ऑटोमेटिक टायमिंग सिस्टिम टच पॅड वापरली गेली होती.

टाइम्स स्पेशल

या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीचा शुभारंभ राज्य सचिव राजेंद्र पालकर यांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करून करण्यात आले. तर दुपार नंतर बक्षीस वितरण पार पडले. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल, सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट, कॅप देण्यात आले. ग्रुपमध्ये विजेत्यांना रोख बक्षिसे, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. एकूण आठ लाख रुपये रकमेची पारितोषिके, भेटवस्तू देण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभास जलतरण संघटना अध्यक्ष डॉ. दिपक परब, राज्य सेक्रेटरी राजेंद्र पालकर, माजी सेक्रेटरी किशोर वैद्य, राष्ट्रपती अवार्ड राष्ट्रीय जलतरणपटू रुपाली रेपाळे, पत्रकार संघ अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, नंदकिशोर महाजन, प्रफुल्ल देसाई, मनोज चव्हाण, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर, कृष्णा ढोलम, महेश कदम, भूषण मेतर, समीर म्हाडगुत, कुणाल मांजरेकर, आप्पा मालंडकर, डॉ. राहुल पंतवालावलकर, उद्योजक बंडू कांबळी, युसूफ चुडेसरा, सचिन शिंदे, किशोर पालकर, निल लब्दे, अरुण जगताप, समीर शिर्सेकर, डॉ. सचिन शिंदे, सुनील मयेकर, आदित्य डोयले, साहिल पालकर, इशिका पालकर, दीपाली डोईले, प्राची डोईले, राधिका पालकर, छाया डोईले, योगिता महाकाळ यांसह अन्य आयोजक व मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

चैतन्य शिंदे व अहुजा उगले ठरले वेगवान जलतरणपटू

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg