loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशीत ‘बीएसएनएल’ ची सेवा ठप्प, बँकांचे व्यवहार कोलमडले!

साटेली भेडशी (प्रतिनिधी) - ‘कनेक्टिंग इंडिया’चा नारा देणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेड च्या सेवेचा साटेली भेडशी परिसरात पूर्णपणे फज्जा उडाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नेटवर्क गायब असल्याने ग्राहकांचा संपर्क तुटला असून, त्याचा मोठा फटका बँकिंग व्यवहारांना बसला आहे. वारंवार खंडित होणाऱ्या सेवेमुळे नागरिकांमधून बीएसएनएल प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. साटेली भेडशी ही बाजारपेठ असून येथे अनेक शासकीय कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँका आणि पतसंस्था आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलची ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा वारंवार कोलमडत आहे. रेंज नसल्याने मोबाईल शोभेची वस्तू बनले आहेत, तर इंटरनेट अभावी शासकीय आणि खाजगी कामे खोळंबली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बीएसएनएलच्या या भोंगळ कारभाराचा सर्वात मोठा फटका येथील बँकिंग क्षेत्राला बसला आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे बँकांमधील ‘सर्व्हर डाऊन’ आणि ‘लिंक फेल’च्या समस्या नित्याच्या झाल्या आहेत. पैसे भरणे, काढणे किंवा शासकीय योजनांचे लाभ जमा होणे यांसारखे व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे वयोवृद्ध पेन्शनधारक, व्यापारी आणि सामान्य खातेदारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून तासनतास बँकेत रांगेत उभे राहावे लागत आहे. एकीकडे खाजगी टेलिकॉम कंपन्या 5G सेवा देण्यासाठी स्पर्धा करत असताना, सरकारी कंपनी असलेली बीएसएनएल मात्र साधी कॉलिंग सुविधा देण्यातही अपयशी ठरत आहे. केबल तुटणे, बॅटरी बॅकअप नसणे किंवा तांत्रिक बिघाड अशी जुजबी कारणे पुढे करून अधिकारी हात झटकतात, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. साटेली भेडशी सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जर अशी परिस्थिती असेल, तर ग्रामीण भागात काय अवस्था असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टाइम्स स्पेशल

बीएसएनएलने आपली सेवा तत्काळ सुरळीत न केल्यास आणि ग्राहकांची होणारी ही पिळवणूक न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा साटेली भेडशीतील संतप्त ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी दिला आहे. वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg