loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबेकरजींचे संस्कार एनटीसी मिल प्रश्नी निश्चितच यश मिळवून देतील! - गोविंदराव मोहिते

मुंबई : केंद्र सरकारने कोविडचे कारणपुढे करून बंद ठेवलेल्या मुंबईसह देशातील २३ एनटीसीच्या गिरण्या अद्याप सुरू केलेल्या नाहीत. गेली ५ वर्षे संघटनेने आंदोलने छेडतानाच न्यायालयीन मार्ग चोखळले आणि आतातर एनसीएलटी सारखा न्यायधीकरण्याचा मार्ग चोखाळून सत्याचा लढा सुरू ठेवला आहे,आम्हाला खात्री आहे,आंबेकरजींचे संस्कार आणि संघटने अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांचे खंबीर नेतृत्व याकामी यश मिळवून देईल, असा विश्वास राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे गं.द.आंबेकर स्मृतिदिनी बोलताना व्यक्त केला. राष्ट्रीय मिल मंजूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी सभागृहात संघटनेचे आद्य संस्थापक कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांचा ६१वा पुण्यतिथीदिन संपन्न झाला. त्यावेळी सरचिटणीस गोविंदराव मोहिते स्वर्गीय गं.द. आंबेकर यांना अभिवादन करताना बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या औचित्याने आंबेकर स्मृतीप्रीत्यर्थ विविध स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांचा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्याचा समारोप आणि स्पर्धा विजेत्यांना बक्षीस वितरणही स्मृतीदिनी पार पडले. समारंभाला मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ.कैलास कदम, कामगार सहाय्यक आयुक्त किशोर निमजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कामगार विरोधी केंद्र सरकारने लागू केलेल्या चार कामगार संहिता, राज्य सरकारने आठ तासावरून बारा तास काम करण्याचा केलेला कायदा, लोकशाही तसेच कामगारांच्या अभिस्वातंत्र्याविरोधी राज्य सरकारने पुढे आणलेल्या जनसुरक्षा कायद्याचा सरचिटणीस गोविंदराव मोहिते, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी आपल्या भाषणात खरपूस समाचार घेतला आणि त्या विरोधी कामगारांना आंदोलन तिव्र करण्याचे आवाहन केले.

टाइम्स स्पेशल

पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कामगार सहाय्यक आयुक्त किशोर निमजे यांनी आपल्या भाषणात, गं.द.आबेकर यांनी ध्येय आणि निष्ठेच्या जोरावर गिरणी कामगारांचा यशस्वी लढा उभा केला, असे सांगितले. खजिनदार‌ निवृत्ती देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र इंटकचे कोषाध्यक्ष दिवाकर दळवी, क्रीडाप्रमुख आणि उपाध्यक्ष सुनील बोरकर, सुनिल अहिर, जी.बी.गावडे, राजन लाड, उत्तम गिते, मिलिंद तांबडे सेक्रेटरी शिवाजी काळे, किशोर रहाटे, साई निकम, संजीत खान, वैशाली हेगडमआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg