loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड जेसीजचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित नामुष्टे व त्यांच्या कार्यकारिणीचा आज पद‌ग्रहण सोहळा

खेड (वार्ताहर) - येथील खेड जेसीजचा आज सोमवार दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी खेड शिवनेरीनगर येथील पाटणे लॉन येथे रात्रौ ८ वाजता ४४ वा पद‌ग्रहण समारंभ होत असून खेड जेसीजचे नवनिर्वाचित अध्यक्ष जेएफएम अमित नामुष्टे यांचा व त्यांच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पद‌ग्रहण अधिकारी म्हणून जेसीआय इंडिया झोन XI चे झोन अध्यक्ष जेसी एचजीएफ शबा गौस, पदस्थापना अधिकारी म्हणून झोन XI चे २०२६ चे झोन उपाध्यक्ष जेएफएम यौवन गावडे., प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका आणि चित्रपट निर्मात्या श्रीताई कदम आणि सन्माननीय पाहुणे म्हणून दीपक नोव्होकेम टेक्नॉलॉजिज लिमिटेडचे युनिट हेड उमाकांत रुगे उपस्थित राहणार आहेत.

टाइम्स स्पेशल

तरी खेड जेसीजच्या ४४ पदग्रहण समारंभाला व नवनिर्वाचित अध्यक्ष जेएफएम अमित नामुष्टे व त्यांच्या कार्यकारिणीच्या पद‌ग्रहण सोहळ्याला उपस्थित राहावे. असे विनम्र आवाहन अध्यक्ष जेएफडी अमर दळवी, सचिव जेएफएम कपिल कोळेकर. प्रकल्प संचालक जेएफडी डॉ. दिविजय पवार आणि खेड जेसीआयच्या सदस्यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg