loader
Breaking News
Breaking News
Foto

इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे ‘ऑरेंज द वर्ल्ड’ मोहिमेअंतर्गत जनजागृती उपक्रम

पनवेल :- संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुरस्कृत ‘ऑरेंज द वर्ल्ड’ या आंतरराष्ट्रीय मोहिमेअंतर्गत इनरव्हील क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने नवीन पनवेल येथील सी. के. टी. विद्यालयात इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालय प्रशासनातर्फे इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा ऍड. सुनिता जोशी यांनी ‘ऑरेंज द वर्ल्ड’ मोहिमेचे महत्त्व, महिलांचे हक्क, सुरक्षितता तसेच महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची भूमिका याविषयी विद्यार्थिनींना सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि ज्युनिअर कॉलेज अशा तीन विभागांतून प्रत्येकी तीन विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. उत्कृष्ट पोस्टर सादर करणाऱ्या विद्यार्थिनींना इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी “स्त्रियांवरील हिंसाचार थांबवा” या संदेशासाठी विद्यार्थिनी, शिक्षिका तसेच इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी ऑरेंज रंगाच्या फिती परिधान करून, हातात जनजागृतीपर पोस्टर्स घेत विद्यालयाबाहेरील परिसरात जनजागृती फेरी काढली. या फेरीद्वारे महिलांवरील हिंसाचाराविरोधात समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालिका वर्षा ठाकूर, इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा शुभांगी पिंपळकर, सेक्रेटरी डॉ. अमृता नाईक तसेच इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा जनजागृती मोहिमा सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त केली.महिलांवरील हिंसाचाराविरोधात समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि तरुण पिढीमध्ये समानता, सन्मान व सुरक्षिततेचे मूल्य रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg