loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळुणातील टीडब्ल्यूजे कंपनीत १६०० पोलिसांनीच गुंतवणूक केल्याचा मोठा दावा

चिपळूण (इकलाक खान) - सर्वत्र गाजत असलेल्या टीडब्लूजे आर्थिक फसवणूक प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. या संस्थेतील एकूण ११ हजार गुंतवणूकदारांमध्ये तब्बल १६०० पोलिसांचा समावेश असून त्यामध्ये पोलीस विभागातील एका मोठ्या अधिकार्‍याचा देखील समावेश असल्याची कबुली टीडब्लूजेच्या संचालकानेेच दिली असल्याची माहिती हाती आली आहे. इतकेच नव्हे तर बहुतांश स्थानिक पोलीस कर्मचार्‍यांची गुंतवणूक आपल्याकडे असल्याचेदेखील कंपनीचे संचालकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल्याने खळबळ उडाली आहे. टीडब्लूजे या संस्थेने चिपळूणमध्ये हायटेक असे कार्यालय उभारून सुरुवातीला लोकांना उत्तम परताव्याचे आमिष दाखवले. या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर दामदुप्पट परतावा असेच गुंतवणुकीचे अनेक फायदे दाखवून गुंतवणूकदाराना आकर्षित करण्याचे काम केले. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे लाभही देण्यात आला. त्यामुळे अल्पावधीत टीडब्लूजे चिपळूणमध्ये लोकप्रिय ठरू लागली. सर्वसामान्य नागरिकांसह, ठेकेदार, नोकरदार वर्ग, अधिकारी, कर्मचारी इतकेच नव्हे तर शासकीय सेवेतील मोठमोठ्या अधिकार्‍यांनीदेखील या कंपनीत मोठी रक्कम गुंतवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टीडब्लूजे एक मोठी कंपनी म्हणून चिपळूणमध्ये उदयास आली होती. चिपळूणसह मोठ्या शहरांमध्ये हायफाय कार्यालय आणि कार्यालयात सेवा देण्यासाठी तितकेच हायफाय उच्चशिक्षित कर्मचारी, कार्यालयात मिळणारी सेवा यामुळे सहाजिकच लोकांचा व गुंतवणूकदारांचा विश्वास या कंपनीवर बसू लागला आणि लोकांनी मोठ्या संख्येने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. बघता-बघता कोठ्यावधींची गुंतवणूक टीडब्लूजेमध्ये होऊ लागली होती. संचालकदेखील गुंतवणूकदारांच्या सतत संपर्कात राहून अधिकाधिक सभासद करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. काही महिने, वर्ष हे सर्व सुरू होते. काही गुंतवणूकदारांना वेळेवर लाभ देखील मिळत होता. परंतु अचानक काहीतरी घडले आणि संचालकांनी गुंतवणुकदारांशी असलेला संपर्क बंद केला. गुंतवणूकदारांना लाभ मिळण्यासही उशीर होऊ लागला, त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली. लोक चिपळूण येथील कार्यालयात फेर्‍या मारू लागले. येथे थातुरमातुर उत्तरे मिळू लागली. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले आणि पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होऊ लागल्या. काही दिवसांपूर्वी चिपळूण पोलीस ठाण्यावर गुंतवणूकदारांनी धडक देत आपला संताप व्यक्त करत आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला होता. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले.

टाइम्स स्पेशल

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी संचालक चिपळूणमध्ये आल्याचे समजताच गुंतवणूकदारांनी आपला संताप व्यक्त करत चांगलाच चोप दिल्याची चर्चा देखील सुरू होती. तशा प्रकारच्या काही व्हिडिओ क्लिपदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. आता मात्र जबरदस्त असा गौप्यस्फोट केला असून थेट तपास यंत्रणेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. टीडब्लूजेमध्ये एकूण ११ हजार गुंतवणूकदार असून त्यापैकी १६०० पोलीस आहेत, असा धक्कादायक दावा संचालकाने केला आहे. इतकेच नव्हे तर स्थानिक बहुतांश पोलीस कर्मचारी आपले गुंतवणूकदार असून त्यामध्ये एका बड्या अधिकार्‍याचादेखील समावेश आहे, अशी धक्कादायक कबुली चौकशीदरम्यान दिली आहे. आता यामध्ये किती सत्य आहे, हा तपासाचा भाग आहे. सद्या तरी त्याच्या या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली असून गृहविभागासमोर एक प्रकारे आव्हान उभे राहिले आहे. काय खरे आणि काय खोटे हे पोलीस तपासात पुढे येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg