loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत सागरी सुरक्षा अभियान; पोलीसांकडून वाहनांची कसून तपासणी सुरू

दापोली (प्रतिनिधी) - दापोली शहरातील बुरोंडी नाका चेक पोस्ट येथे सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येत असून अत्यंत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सागरी मार्गे कोठेही आतंकवादी प्रवेश करू शकतात. अशा पार्श्वभूमीवर सागरी कवच सुरक्षा अभियान दापोली शहरातील बुरोंडी पोलीस चेक पोस्ट नाक्यात राबविण्यात येत असून या अभियानामध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सागरी मार्गाने होणाऱ्या विविध धोकादायक कारवाया टाळणे व आपला संपूर्ण भाग सुरक्षित राखणे हा यामागील उद्देश आहे. सदरचे अभियान जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश पाटील यांनी प्रत्यक्ष बुरोंडी पोलिस चेक नाक्यात उभे राहून दापोली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या सहाय्याने यशस्वीरित्या पार पाडत आहेत.

टाईम्स स्पेशल

बुरोंडी पोलिस चेक नाक्यातून बुरोंडी तसेच हर्णे केळशी सागरी मार्गावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी दापोली पोलिसांनी अवलंबिलेल्या या सागरी कवच सुरक्षा मोहीमेचा उपयोग होत आहे. या मोहीमेमुळे पोलिसांचा एक आदरयुक्त धाक वाटत असून नागरिक या मोहीमेचे समाधान व्यक्त करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg